जयपूर : भावा-बहिणीचा सण म्हणजे (Raksha Bandhan) रक्षाबंधन. गुरुवारी 11 ऑग्सटला देशात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा करण्यात आला. मात्र रक्षाबंधनाला एक मन हेलावणारी घटना घडलीय. रक्षाबंधन केल्यानंतर अवघ्या तासाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली. (a lady shows this unfettered love to our wild by tying a rakhi to an ailing leopard)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे रक्षाबंधन अनोखं आणि तितकंच थ्रिलिंगही होतं. एका महिलेने चक्क बिबट्याला राखी बांधली, हो हो बिबट्यालाच. मात्र राखी बांधल्यानंतर या बिबट्याचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. महिलेने बिबट्याला रक्षाबंधन करतानाचा व्हीडिओ मात्र तुफान व्हायरल होतोय.



नक्की काय घडलं? 


नेहमीप्रमाणे ही महिला आपल्या कामानिमित्ताने बाहेर पडलेली. अपेक्षित ठिकाणी जात असताना महिलेला वाटेत बिबट्या दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या गंभीररित्या जखमी होता. बिबट्या मागील बाजूने पूर्णपणे जखमी होता. वनविभागाकडून जखमी बिबट्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात येत होते. या दरम्यान या महिलेने बिबट्याला राखी बांधली.  


राखी बांधल्यानंतर बिबट्याला उपचारांसाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केले. मात्र उपचाराच्या एका तासातच या बिबट्याने जगाचा निरोप घेतला. सहाय्यक वनसंरक्षक राजसमंद विनोद कुमार राय यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. हा सर्व प्रकार राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील आमेट तहसीलचा असल्याचं म्हटलं जात आहे.