पश्चिम बंगालमध्ये दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन सासऱ्याने आपल्या सूनेची हत्या केली. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. झालं असं की, उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हाबरा येथील श्रीनगर मठ क्षेत्रात राहणाऱ्या गोपाल विश्वास यांना भजी खाण्याची इच्छा झाली होती. त्यांची सून मुक्ती विश्वासने भजी बनवली आणि कोल्ड्रिंकसह वाढली. पण यानंतरही सासऱ्याने मुलाच्या गैरहजेरीत सूनेची हत्या केली. आरोपी लष्करातून निवृत्त आहे. मुलाने आपले वडील नेहमीच रागात असतात असं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, सून मुक्तीने भजी बनवली आणि यानंतर कुटुंबातील सदस्य दुपारच्या जेवणासाठी आपापल्या खोलीत गेले. मुक्ती दुपारी आपल्या खोलीत आराम करत होती. ती मोबाईल न्याहाळत बसली होती. यावेळी तिचा मोठा मुलगा संगणकावर काहीतरी करत होता. 


याचवेळी मुक्कीचा लहान मुलगा दिवाळीसाठी फटाके आणण्याचा हट्ट करु लागला. यानंतर मुक्तीचा पती देबू विश्वास फटाके विकत आणण्यासाठी घराबाहेर गेला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा खोलीतून आवाज येत होता. जेव्हा तो खोलीच्या आत गेला तेव्हा तेथील चित्र पाहून धक्काच बसला. त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती. नंतर त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला आणि मुलांना शेजाऱ्यांना घेऊन येण्यास सांगितलं. 


यानंतर मुक्तीला हाबराच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. नंतर पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगण्यात आला. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली सासरे गोपाल विश्वासला अटक केली आहे. 


शेजाऱ्यांनी कुटुंबात कोणताही वाद किंवा कौटुंबिक क्लेष नव्हता असं सांगितलं आहे. दरम्यान गोपाल विश्वासच्या मुलाने वडील फार हट्टी असून त्यांना आपण करु तेच योग्य वाटतं अशी माहिती दिली आहे.