`तुमचाच लाडका शेजारी` आपल्या जागेवर कार पार्किंग करणाऱ्या शेजाऱ्याला घडवली अद्दल...
Car Parking Viral News: आपल्या जागेवर जर का कोणी गाडी पार्क केली तर त्याचा राग आपल्या येतोच. सध्या असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे त्यामुळे त्यानं त्याच्या गाडीवरच विनंतीपत्र चिकटवलं आहे. पहा त्यानं असं लिहिलंय तरी काय?
Car Parking Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे व्हायरल पोस्टची. आपल्या शेजाऱ्यांशी आपलं कशावरून काय भांडणं होईल किंवा मतभेद होईल हे काहीच सांगता येत नाही. गाडी पार्क करण्यावरूनही अनेकदा शेजाऱ्या पाजऱ्यांमध्ये मतभेद होताना दिसतात. आपल्या जागेवर गाडी का पार्क केली? यावरूनही मतमेद होयला फारसा वेळही लागत नाही. कधीतरी चुकून असा प्रकार झाला कर काही हरकत नसते परंतु मुद्दाम कोणी आपल्या शेजारचा असं काही करत असेल तर ज्याची ती पार्किंगची जागा आहे त्याची चिडचिड होणे स्वाभाविकच. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे ज्यात एका शेजारी आपल्या दुसऱ्या शेजाऱ्याला चांगली तंबी दिली आहे.
ही घटना बंगलोरची आहे. सुभाषिस दास या एका युझरनं ही पोस्ट व्हायरल केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, कोरामंगला, बंगलोर येथे मला हे सापडलं आहे. एका शेजाऱ्यानं चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्यानं आणि आपल्या जागी गाडी पार्क केल्यानं त्याला एक रिक्वेस्ट नोट लिहून दिली आहे आणि चक्क ही नोट त्याच्या गाडीच्या काचेवरच त्यानं लावली आहे. यावेळी त्यानं नोटमध्ये लिहिलंय की, ''हाय, तुम्हाला विनंती आहे की तुमची गाडी येथे पार्क करू नका. आम्ही तुम्हाला याआधीही वेळोवेळी हे सांगत होतो की याठिकाणी अजिबातच गाडी पार्क करू नका.
हेही वाचा - सोशल मीडियाचा वापर कमी केल्याने तरूणांमध्ये दिसून येतो 'हा' बदल, पाहा अभ्यासातून काय समोर आलंय?
समजून घ्या की आम्ही या ठिकाणी 2000 सालापासून राहतो आहोत आणि आमच्याकडे दोन गाड्या आहेत. त्यामुळे आम्हाला चांगली पार्किंग स्पेस असणं महत्त्वाचं आहे आणि ती आमच्याकडे आहे. कृपया तुमच्या आधीच्या पार्किंग स्लॉटच्या इथे जा आणि तुमची गाडी पार्क करा. एकमेकांशी चांगले वागू आणि एकमेकांना साहाय्य करू. धन्यवाद, तुमचाच शेजारी.''
या व्यक्तीनं केलेल्या या नेटिसवरून असेच दिसते आहे की ही व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला वारंवार सांगत होती की याठिकाणी कार पार्क करू नये परंतु हा शेजारी ऐकत नव्हता आणि शेवटी त्याला कंटाळूनच त्यानं हा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यानं आपल्या शेजाऱ्यापर्यंत आपलं म्हणणं पोहचावे आणि कुठलंही भांडणं होऊ नये म्हणून ही नोटीस थेट त्याच्या गाडीच्या काचेवरच चिकटवली. त्यामुळे सध्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.