रस्त्यावरच लाईव्ह मर्डर, पतीने पत्नीला एकामागोमाग अनेक वेळा भोसकलं, नंतर मित्राच्या दिशेने वळला अन्...
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने रस्त्यातच पत्नीची सर्वांसमोर चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी रस्त्यावरुन जाणारे लोक हतबलपणे पाहत उभे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने रस्त्यातच पत्नीची सर्वांसमोर चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यादरम्यान रस्त्यावरुन जाणारे इतर लोक हतबलपणे पाहत उभे होते. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दिवाकर हा बंगळुरुमधील बनसवाडी येथून आपली पत्नी निकिता आणि मित्र प्रदीप यांच्यासह प्रवास करत होता. सीसीटीव्हीत दिसत आहे, त्यानुसार, प्रदीप दुचाकी चालवत होता. यावेळी त्याने मुद्दामून आपली दुचाकी एका बाजूला झुकवली जेणेकरुन निकिता खाली पडेल. सीसीटीव्हीत निकिता खाली पडताना दिसत आहे.
यानंतर दिवाकर पत्नीवर हल्ला सुरु करतो. दिवाकर एकामागोमाग अनेक वेळा निकितावर धारदार शस्त्राने वार करतो. यानंतर तो आपला मित्र प्रदीसह दुचाकीवरुन पळ काढतो. हे सर्व घडत असताना समोरच एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला थांबलेला असतो. हा सगळा प्रकार पाहून तो तेथून पळ काढतो. दुसरीकडे निकिता रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना तेथून जाणारे लोकही हतबलपणे पाहत उभे असतात.
यानंतर काही स्थानिक पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती देतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस निकिताला घेऊन रुग्णालयात धाव घेतात. निकिताची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी तपासानंतर दिवाकर आणि प्रदीप यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
दिल्लीतील हत्याकांडाला उजाळा
Delhi Murder Case: राजधानी दिल्लीतही (Delhi) अशाच प्रकार हल्ला करत एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. 20 वर्षीय आरोपी साहिल खानने (Sahil Khan) 16 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केली होती. आरोपीने तब्बल 22 वेळा तरुणीला चाकूने भोसकलं आणि नंतर डोक्यात चार वेळा दगड घातला होता. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) आरोपीला अटक केली असून बेड्या ठोकल्या.
हत्या केल्यानंतर आरोपी हत्येच्या ठिकाणी म्हणजे रोहिनीमधील (Rohini) शहाबादमध्ये (Shahabad) फिरत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास अर्धा तास तो बिनधास्तपणे परिसरात वावरत होता.
दिल्ली पोलिसांनी ही हत्या रागाच्या भरात झाली असल्याचा दाव्यावर शंका उपस्थित केली असून, हा पूर्वनियोजित कट होता असा असे संकेत दिले आहेत. याचं कारण म्हणजे, साहिलने 15 दिवसांपूर्वी हरिद्वार येथून चाकू विकत घेतला होता,