नवी दिल्ली  : उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाने आपल्या ९० वर्षाच्या आईला घराबाहेरच्या ऑटोमध्ये साखळीने बांधून ठेवले आहे. कडाक्या थंडीमध्ये त्याची आई ऑटोच्या मागच्या सीटवर पातळ चादरीच्या आत दिसून येते.


त्या आज्जीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा आरोप तिच्या घरातल्यांनी केला आहे. ती जेवायला विसरते, घराबाहेर निघून जाते, मूलं हिला दगड मारतात असे तिच्या सुनेने माध्यमांना सांगितले.


दोन-तीन महिने फक्त ?


आम्ही केवळ दिवसभर तिला इथे बांधून ठेवतो, रात्री घराच्या आत झोपायला देतो असे सुनेने सांगितले. हिला ऑटोमध्ये बांधल्यास जास्त दिवस झाले नाहीत.


दोन-तीन महिन्यांपासूनच तिला असे बांधले गेले आहे असेही तिच्या सुनेने सांगितले.


पेन्शनच काय ?


ऑटोला बांधल्या गेलेल्या या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे. ते एक सरकारी कर्मचारी होते असे सांगितले जाते. त्यांची पेन्शन या बुजुर्ग स्त्रीला मिळते. पण या पेन्शनचे पुढे काय होते हे समोर येत नाही. 


बेड्यांनी बांधण हा पर्याय ?


९० व्या वर्षात स्मरणशक्ती जाणं हे स्वाभाविक आहे. अशावेळी कोणी बोलायला जवळ नसल की मनुष्य इथे तिथे शोध सुरू करतो. अनेकदा चिडचिड करतो, शिव्याही देतो. पण लोखंडी बेड्यांनी बांधून ठेवणं हा त्याच्यावर पर्याय नाही. 


म्हाताऱ्या आईची अपेक्षा ?



जी आई आपल्या मुलांसाठी आयुष्यभर दु: ख सहन करतते ती म्हातारपणी काय अपेक्षा ठेवत असेल? शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.


लोखंडी साखळीतून काढून तिला घरी ठेवावी अशी शेजारच्यांचीही मागणी होती. पोलीस या घटनेची चौकशी करत असल्याचे मेरठचे एसपी सिटी मान सिंह यांनी सांगितले.