Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (Social Media Viral Video) व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ मनोरंजन करतात. अशातच आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामुळे तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे स्टेशनवरील फिल्मी स्टाईलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने (Trending Video Of railway CCTV Footage) वाचवले वृद्धाचे प्राण वाचवल्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कटनी येथील मुडवारा रेल्वे स्थानकावरील (Mudwara Railway Station) धक्कादायक घटना कॅमेऱ्यामधून समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये केबिनजवळून एक वृद्ध रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक त्या रूळावरून रेल्वे येते. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील लोक वृद्धाला आवाज देऊन सावध करण्य़ाचा प्रयत्न करतात.


केबिनमध्ये ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने (Railway Employee) वृद्घाला रेल्वे रुळाकडे जाताना पाहिलं. रेल्वे कर्मचाऱ्याला काय करावं कळेना. काहीही न विचार करता रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वे पुलाकडे धाव धेतली. रेल्वे वेगाने येत होती, तरीही वृद्धाला रेल्वे येत असल्याचा पत्ता लागला नाही.



रेल्वे कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून वृद्धाच्या दिशेने धाव घेतली आणि वृद्धाचा जीव वाचवला. फिल्मी स्टाईलने हा सर्व प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. वृद्ध व्यक्तीला कमी दिसायला येत होतो, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच या रेल्वे कर्मचाऱ्याचं कौतूक देखील होताना दिसतंय.


आणखी वाचा - CCTV VIDEO : रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यांची तरुणाला मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!