पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यभराचा जोडीदार मिळवण्याच्या नादात एका डॉक्टरने आपल्या सुखी जीवनात संकट ओढावून घेतलं आहे. मॅट्रिमोनिअल साईटवरुन ओळख झालेल्या तरुणीशी विवाह करणं डॉक्टर पतीला चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण नवविवाहित पत्नीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच डॉक्टर पतीकडे 50 लाखांची मागणी केली. यानंतर धक्का बसलेल्या पतीला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे याची जाणीव झाली. यानंतर अखेर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली. 


पहिल्या पत्नीपासून घेतला होता घटस्फोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहगंज येथे राहणाऱ्या डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की, 2019 मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. मुलीची जबाबदारी त्याच्यावर आहे. मॅट्रिमोनिअलच्या माध्यमातून गाजियाबादमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी भेट झाली होती. महिलेने आपण शिक्षक आणि वकील असल्याचं सांगितलं होतं. ऑगस्ट 2022 मध्ये लग्नाची बोलणी करण्यासाठी ते गाजियाबादमध्ये आले होतं. आपण या सगळ्या कटात अडकले गेलो. 


लग्नानंतर केली पैशांची मागणी


गाजियाबादला लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले असता तिथे लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. यानंतर पत्नीने दबाव टाकत लग्न केलं. लग्नानंतर ती घऱी आली असता कुटुंब आणि संपत्तीची सर्व माहिती घेत राहिली. पत्नीचं कर्तव्य पूर्ण करण्याऐवजी 50 लाख रुपये आणि पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाच्या नावे संपत्ती करण्यासाठी दबाव टाकू लागली असा डॉक्टरचा आरोप आहे. 


चाकूने केला हल्ला


डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की, पत्नीचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला असता तिने छळ करण्यास सुरुवात केली. तिन मारहाण आणि शिवीगाळ सुरु केली होती. एप्रिल महिन्यात घरातून बाहेर जात असताना छतावरुन कुंडी फेकली होती. यातून मी थोडक्यात बचावलो होतो. तिने माझ्यावर चाकूनेही हल्ला केला होता. माझी संपत्ती मिळवण्यासाठी कट रचला होता. डॉक्टरने आरोप केला आहे की, पत्नीने मुलीच्या जेवणात धीम्या गतीने विष मिसळण्यास सुरुवात केली. यामुळे मुलीची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. 


पत्नीने मानसिक छळ करण्यासाठी नवे हातखंडे वापरले होते. 1 जुलैला तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. संपूर्ण रात्रभर तिने दरवाजा उघडला नाही. काहीतरी घडलं असावं असा संशय आल्याने पोलिसांना बोलावण्यात आलं. दरवाजा तोडला असता पत्नी आतमध्ये आरामशीर बसलेली होती. जोवर संपत्ती नावावर करत नाही, तोवर असाच त्रास देणार नाही असं ती सांगू लागली. तिने सुरक्षेसाठी घरात लावलेले सीसीटीव्हीही तोडले. 


दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा आरोप


डॉक्टरचा आरोप आहे की, 6 ऑक्टोबरला दुपारी पत्नीने घरातील सर्व दागिने आणि 2 लाख रुपयांसह मूळ प्रमाणपत्रं नेली. पत्नी 16 ऑक्टोबरला पुन्हा घरी आली होती. यावेळी तिने रुग्णालय आणि कार्यालयाचं कुलूप तोडलं. डेबिट कार्ड, पासबुक, चेकबुक, रिसर्च पेपर आणि इतर फॉर्म ती घेऊन गेली. याप्रकरणी पीडितने अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या आदेशानुसार तपासानंतर पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहागंजचे प्रभारी निरीक्षक आलोक सिंह यांनी सांगितले की, तपासानंतर पुरावे गोळा केले जात आहेत, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.


डॉक्टरने पत्नीने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओही पुरावा म्हणून पोलिसांकडे दिला आहे. यामध्ये पत्नी मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान आरोपी पत्नीचा भाऊ पोलीस निरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याने पहिणीपासून अंतर ठेवलं आहे.