मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) महिला आपल्या दीरासोबत (Brother in Law) पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तरपूर येथे ही घटना घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे. सुंदर मूल जन्माला यावं यासाठी महिलेने हे पाऊल उचललं. महिलेने आपल्या पतीकडे आपले हेतू बोलूनही दाखवले होते. तुझा भाऊ तुझ्यापेक्षा जास्त हँडसम असल्याने मी त्याच्याकडे आकर्षित होत असल्याचं महिलेने तीला सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पळून गेल्यानंतर महिलेने पती आणि सासऱ्यांना धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. यामध्ये ती आपण आत्महत्या करु अशी धमकी देत होती. तसंच जर काही तिच्यासोबत काही वाईट घडलं तर तेच जबाबदार असतील असं सांगत होती. 


महिलेचा पती आणि कुटुंबाने छत्तरपूर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं अशी माहिती समोर येत आहेत. बुधवारी कुटुंबाने पोलिसांकडे महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पत्नीचं कधीच आपल्यावर प्रेम नसल्याने आणि आपल्यापासून मूल व्हावं अशी तिची इच्छा नसल्याने ती सोडून गेली असा पतीचा दावा आहे. आपला छोटा भाऊ आपल्यापेक्षा जास्त हँडसम असल्याने तिचं त्याच्यावर प्रेम जडलं होतं असाही त्याचा दावा आहे. 


पतीने सांगितल्यानुसार, त्यांच्या लग्नाला 10 वर्षं झाली होती. लग्नाच्या दहा वर्षानंतर आणि मूल होत नसल्याने तिने आपल्या पतीला सांगितलं की तिला त्याच्यापासून मूल नको आहे कारण तो दिसायला देखणा नाही. तसंच तिला आपला मेहुणा अधिक आकर्षक आहे आणि तो तिला एक सुंदर बाळ देईल असं वाटत होतं. पतीने आध्यात्मिक उपाय शोधण्यासह सर्व गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण महिला काहीही ऐकण्यास तयार नव्हती. 


पोलिसांनी दाखल केली बेपत्ता झाल्याची तक्रार


पतीने कुटुंबासह आता पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत पत्नीपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने केवळ त्याला सोडले नाही, तर ती त्याला धमकीचे संदेशही पाठवत आहे.


कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, ती सतत मेसेज करुन आपण आत्महत्या करु आणि त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरु अशी धमकी देत आहे. तिला ज्याच्यासोबत राहयचं आहे त्याच्यासोबत राहू शकते, आम्हाला त्यात काही समस्या नाही. पण तिने आम्हाला धमक्या देत त्रास देणं बंद करावं असं कुटुंब म्हणालं आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) विक्रम सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.