नवी दिल्ली : सध्या फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा वाढता आकडा लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केला. पण अनेक ठिकाणी या लॉकडाऊनचा फज्ज उडताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या आहे. तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घरा बाहेर पडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पोर्श कारमधून एक तरूण बाहेर भटकत होता, तेव्हा इंदूरच्या सुरक्षा समितीच्या कर्मचाऱ्याने त्या तरूणाला चक्क रस्त्यावर  उठाबशा काढायला लावल्या. या तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या तरूणाच्या कामगीरीला दुजोरा दिला आहे. 



ऐकीकडे पोलिस, डॉक्टर, नर्स, सुरक्षा कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून देशावर आलेल्या संकाटासोबत दोन हात करत आहेत. ही माणुसकीची लढाई लढत असताना यातील काही कोरोनावीरांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. पण देशातील काही नागरिकांनी संकटाचे गांभीर्य नसल्याचे सतत दिसून येत आहे. 


देशाच्या अनेक भागात लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिस अनेक नव-नवीन शकली लढवून बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवत आहेत.