Aadhaar Card Download UIDAI Instruction: देशात आधार कार्ड महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून बँक, शाळा आणि इतर ठिकाणी आधारकार्डची आवश्यकता असते. त्यामुळे आधार कार्डची सिक्योरिटीही तितकीच महत्त्वाची आहे. आधारकार्ड अनेक ठिकाणी वापर होत असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता देखील वाढली आहे. यासाठी यूआयडीएआयने ट्वीट करत याबाबत लोकांना माहिती दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूआयडीएआयने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "E-Aadhaar डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे, कियोस्क किंवा इतर पब्लिक पब्लिक प्लॅटफॉर्मचा वापर करू नका. जर अशा जागी आधारकार्ड डाउनलोड केलं असेल तर डिलीट करण्यास विसरू नका."



आधार क्रमांकाने बँक खातं हॅक होऊ शकते का?


बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत आधार क्रमांकावरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रकरणाची माहितीही यूआयडीएआयने दिली आहे. यूआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, फक्त आधार क्रमांक जाणून घेऊन बँक खाते हॅक केले जाऊ शकत नाही. 


तुम्ही अशी चूक केली तर येईल Income Tax ची नोटीस!


तुम्ही तुमचा आधार क्रमांक उघड करू इच्छित नसल्यास, तुम्ही व्हीआयडी किंवा मास्क केलेले आधार वापरू शकता, ते वैध आणि व्यापकपणे स्वीकारले जाते. मास्क्ड आधारमध्‍ये तुमच्‍या 12 अंकी आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात आणि फक्त शेवटचे 4 अंक दिसतात.