मुंबई : Aadhaar Card Latest News: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवायही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. आधार जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI)ही नवी घोषणा केली आहे. (Aadhaar Card Latest News: Good news for Aadhaar card users.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेषत: ज्यांनी आपला मोबाईल नंबर नोंदविला नाही, अशा लोकांना मदत करण्यासाठी UIDAI ने हे मोठे पाऊल उचलले आहे. वास्तविक, पूर्वीच्या यूसर्ससाठी आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आधारशी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक होता. मोबाईल नंबरशिवाय तुम्ही आधार कार्ड कसे डाऊनलोड करू शकता ते जाणून घ्या.


आधार डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत


1. यासाठी तुम्ही प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'My Aadhaar' वर टॅप करा.
2. आता 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' वर क्लिक करा.
3. आता 12 अंकी आधार क्रमांक टाका.
4. तुम्ही आधार क्रमांकाऐवजी 16 अंकी आभासी ओळख क्रमांक (VID) देखील टाकू शकता.
5. या प्रक्रियेनंतर, तुम्हाला दिलेला सुरक्षा किंवा कॅप्चा कोड टाका.
6. जर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय कार्ड डाऊनलोड करायचे असेल, तर 'माय मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही' या पर्यायावर क्लिक करा.
7. आता तुमचा पर्यायी क्रमांक किंवा नोंदणी नसलेला मोबाईल क्रमांक टाका.
8. आता 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा
9. त्यानंतर तुम्ही एंटर केलेल्या पर्यायी मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.
10. पुढे, तुम्ही 'अटी आणि नियम' चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नंतर 'सबमिट' वर क्लिक करा.
11. आता तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
12. पुनर्मुद्रणाच्या पडताळणीसाठी, तुम्हाला येथे आधार पत्राचे पूर्वावलोकन करण्याचा पर्याय मिळेल.
13. यानंतर तुम्ही 'मेक पेमेंट' हा पर्याय निवडा.