आता मोबाईल नंबर शिवाय डाउनलोड करता येणार Aadhaar Card, जाणून घ्या प्रोसेस
आधार कार्ड धारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, Aadhaar डाऊनलोड करणे झाले आणखीण सोप्पे
मुंबई : आधार कार्डधारकांसाठी (Aadhaar Card) एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवायही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने याबाबतची घोषणा केली आहे. या घोषणेने आधारकार्ड धारकांना दिलासा मिळालाय.
आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) मोबाईल नंबर रजिस्टर नसल्याने अनेकांची पंचाईत होत होती. ऑनलाईन आधारकार्ड डाऊनलोड करणे अनेकांना अवघड जात होते. अशा आधार धारकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण आता आधारकार्ड धारकांना मोबाईल क्रमांक रजिस्टर नसतानाही आधार डाऊनलोड करता येणार आहे. ज्यांचे मोबाईल नंबर रजिस्टर नाही आहेत, त्यांच्यासाठी हा दिलासा असणार आहे.
दरम्यान खाली दिलेल्या पर्यायानुसार तुम्हाला आधार डाऊनलोड करता येणार आहे.
'या' स्टेप्स द्वारे डाऊनलोड करता येणार
- प्रथम तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'माय आधार' वर टॅप करा.
- आता 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' वर क्लिक करा.
- आता तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल.
- आधार क्रमांकाऐवजी 16-अंकी आभासी ओळख क्रमांक (VID) देखील प्रविष्ट करू शकता.
- या प्रक्रियेनंतर, आपण दिलेला सुरक्षा किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- जर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर 'माय मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही' या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा पर्यायी क्रमांक किंवा नोंदणी नसलेला मोबाईल क्रमांक टाका.
- आता 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा
- आता तुम्ही दिलेल्या पर्यायी क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.
- 'अटी आणि नियम' चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नंतर 'सबमिट' वर क्लिक करा.
- आता तुम्हाला नवीन पृष्ठावर नेले जाईल.
- पुनर्मुद्रणाच्या पडताळणीसाठी, तुम्हाला येथे आधार पत्र पूर्वावलोकनाचा पर्याय मिळेल.
- तुम्ही 'पेमेंट करा' हा पर्याय निवडा.
या सोप्या पद्धतीने आता तुम्हाला आधार डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड धारकांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे.