Aadhaar Card धारकांसाठी सर्वात मोठी बातमी!
Aadhaar Card : तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? जर आहे तर ही बातमी नक्की वाचा
Fake Aadhaar Card: देशात आधार कार्ड (Aadhaar Card) हे सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणतीही शासकिय अथवा खाजगी कामे असो आधारकार्ड शिवाय काम होत नाही. मात्र ही कामे करताना अनेकजण कागदपत्रे कुठेही टाकत असतात. जसे काम झाले की आधारचा झेरॉक्स कचऱ्यात अथवा रद्दीत जातो. ज्यामुळे या आधार कार्डचा दुरुपयोग होतो, आणि काही लोक या कागद पत्रावरून बनावट (Fake Aadhaar Card) बनवून घेतात. आता हाच आधार कार्डचा बनावटपणा रोखण्यासाठी सरकारने एक सूचना जारी केली आहे. ही सुचना काय आहे ती जाणून घेऊय़ात.
हे ही वाचा : सेक्स करताना झाला मृत्यू, अन् मग महिलेने जे केले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल
सुचना काय?
बनावट आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर थांबवण्यासाठी सरकारने एक सूचना जारी केली आहे. सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, त्यामुळे हा 12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी केली पाहिजे.
UIDAI कडून परिपत्रक जारी
आधार (Aadhaar Card) जारी करणारी संस्था UIDAI ने सर्व विभागांना एक परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीचे आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी. तसेच UIDAI ने असेही सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या संमतीने त्याचे आधार कार्डच्या कोणत्याही स्वरूपाची म्हणजेच E आधार, आधार PVC कार्ड आणि M आधार (mAadhaar) तपासले जाऊ शकते. जेणेकरून आधारचा गैरवापर थांबेल.
गैरवापर दंडनीय गुन्हा
सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायझरीनुसार, आधार (Aadhaar Card) पडताळणी केल्यावर बनावट कार्डची माहिती कळेल. अशा परिस्थितीत, बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले जाईल. तसेच आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत शिक्षेसाठी जबाबदार धरले जाईल.
बनावट आधार असे तपासा
आधार कार्ड (Aadhaar Card) , ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि एम-आधार यांसारख्या सर्व फॉर्मवर उपलब्ध असलेल्या QR कोडचा वापर करून mAadhaar अॅप किंवा आधार QR कोड स्कॅनर वापरून कोणत्याही आधार कार्डची सत्यता तपासली जाऊ शकते. QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाईल फोन तसेच विंडो ऍप्लिकेशनसाठी उपलब्ध आहे.
नागरीकांना आवाहन
UIDAI ने आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांना आवाहन केले आहे की, अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचे आधार कार्ड कुठेही वापरतात किंवा त्याच्या सुरक्षेकडे लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांचे आधार कार्ड योग्य ठिकाणीच वापरावे. त्याच्या प्रती इकडे-तिकडे फेकण्याऐवजी काळजीपूर्वक ठेवा. आधार क्रमांक किंवा कार्ड सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका.
UIDAI ने केलेले आवाहन तुम्ही पाळलात तर बनावट आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर थांबणार आहे.