How To Update Aadhaar Card: आधार कार्ड सर्व नागरिकांना आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी योजनेत लाभ घेण्यापासून ते बँक आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे. तुमच्या आधार कार्डची सुरक्षा खूप महत्वाची असते. ज्यामुळे UIDAI वारंवार नियम बदलत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड वेळोवेळी अपडेट (Aadhaar Card Update) केलं पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्डशिवाय वित्त व्यवहार (financial dealings) करणं सोपी गोष्ट नाही. बँक खातं (Bank Account) उघडण्यापासून ते कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनेचा (Government Scheme) लाभ घेण्यासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे. 


आधार कार्ड अपटेड करा (Aadhaar Card Update)


आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर त्यामुळे तुमची 'ओळखणीचा पुरावा' (Proof of Identification) आणि 'पत्त्याचा पुरावा' (Address Proof) पुन्हा अपलोड करून त्याची पुन्हा पडताळणी करण्याची विनंती सरकारने सर्वांना केली आहे.



दरम्यान, ऑनलाइन अपलोड करण्यासाठी 25 रुपये आणि ऑफलाईनसाठी 50 रुपये पैसे मोजावे लागलीत. मात्र, तुमचा डेटा सुरक्षित राहील. बायोमेट्रिक अपडेटसाठी (Biometric Update) तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. यूझर्सला कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली तर त्याची माहिती त्वरित द्यावी. सोबतच त्याचा रिपोर्टही दाखल करावा, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.


जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया - (How To Update Aadhaar Card)


प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. तिथं गेल्यावर आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा आणि 'प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस' या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा पर्याय दिसेल. पटकन क्लिक करा. 12 अंकी आधार क्रमांक टाका अन् 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा. 


PAN Card: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा..


ओटीपी (OTP) टाका आणि लॉगिन करा. 'अपडेट न्यू अॅड्रेस प्रूफ' हा पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता टाका. अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाची कागदपत्रे निवडा. पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा. आधार अपडेट विनंती स्वीकारली जाईल आणि 14-अंकी अपडेट विनंती क्रमांक तयार केला जाईल.