मुंबई : आधार कार्डच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. हफिंगटन पोस्टने याबाबत एक खुलासा केलाय. आधारच्या डेटाबेसमध्ये एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आधार डेटाबेस हॅक होऊ शकतो, तसा अहवाल एका माध्यमाने दिलाय. एका सॉप्टवेअरमधील सिक्युरिटी फिचर बंद करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. केवळ 2500 रुपयांत हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून डेटा हॅक होऊ शकतो.  दरम्यान, सरकारकडून नागरिकांच्या ओळखपत्रासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या बातमीनंतर आधार कार्डच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हफिंगटन पोस्टने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, कोणीही अनाधिकृतव्यक्ती केवळ 2500 रुपयांत मिळणाऱ्या या सॉफ्टवेअरद्वारे जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून आधारचा आयडी तयार करु शकतो. सध्या, आधार डेटाबेसमध्ये 1 कोटीपेक्षा अधिक लोकांची खासगी माहिती आणि बायोमेट्रिक्स डिटेल्स आहेत.


वॉट्सअॅप ग्रुप्सवर उपलब्ध 


बाजारपेठ उपलब्ध असणारे हे सॉफ्टवेअरद्वारे जगात कोठेही बसून हॉकर्स बेसचे सुरक्षा भेदून डाटा वितरीत करणे अत्यंत सोयीचे आहे. तसेच जुना नंबर बदलून नवीन आधार नंबर बनविता येऊ शकतो. रिपोर्टनुसार आधार सुरक्षा भेदण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर होऊ शकतो. तसेच अनेक वॉट्सअॅप ग्रुप्सवर हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर वापरण्यास खूप सोपे आहे.


माहिती सहज बदला येते


सॉफ्टवेअरमधील एका महत्वाच्या कोडचे (पॅच) संशोधन केले. या सॉफ्टवेअरचा वापर केल्यास सोयीस्कर पॅच सहज बदलता येते. केवळ 2500 रुपये खर्च येतो. आधारची माहिती सहज बदलता येऊ शकते. विशेष म्हणजे अशा नंबर्संचा सध्या वापर होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. रिपोर्टनुसार युजर्स महत्वपूर्ण सुरक्षा फिचर्स हॅक करु शकतात. ज्याद्वारे बेकायदेशीरपणे आधार नंबर जनरेट केला जाऊ शकतो. 



दरम्यान, आधार इंडिया म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडियाने हे वृत्त फेटाळून लावलेय. तसेच हे संशोधन निराधार असून आधार पूर्णपणे सुरक्षित आहे.  सोशल आणि ऑनलाइन मीडियात आधार एनरोलमेंट सॉफ्टवेअर कथितरित्या हॅक झाल्याचा वृत्त पूर्णपणे चुकीचेअसल्याचे यूआयडीएआयने निवेदनात म्हटले आहे.