नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या काही आमदारांना जोरदार दणका दिला आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. ‘आप’ने आपल्या १५ विद्यमान आमदारांना दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी कापली आहे. त्याचवेळी २४ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पतपरगंज येथून  निवडणूक लढवत आहेत. 



 'आप'ने  आठ महिलांना उमेदवारी दिली आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर २२ जानेवारी रोजी अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. २४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. २२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.


दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी असणार आहेत. 'आप'ने  विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. तशी सुरुवात आहे.