महिला आमदाराने पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत बांधली लग्नगाठ, लाखोंचा खर्च टाळत घातला नवा आदर्श
महिला आमदाराने आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यासोबत विवाह केला आहे. लाखोंचा खर्च टाळत साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला आहे.
नवी दिल्ली : प्रेमात काहीही पाहिले जात नाही हे खरे आहे. मग तो कितीही मोठा व्यक्ती असला तरी देखील. आज आम्ही तुम्हाला अशा प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये एका महिला आमदाराने थेट पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत विवाह केलाय. आमदार होताच दर्जा वाढतो. आमदार-खासदार आपले कार्यक्रम संस्मरणीय करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. पण याला बगल देत पंजाबमधील एका महिला आमदाराने अगदी सामान्य पद्धतीने लग्न केले आहे. पंजाबमधील या आमदाराने पक्षाच्या कार्यकर्त्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह पटियाला येथील गुरुद्वारामध्ये सामान्य पद्धतीने पार पडला.
पक्षातील कार्यकर्त्यासोबत विवाह
वधू नरिंदर कौर भराज (AAP MLA Narinder Kaur) गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकिटावर प्रथमच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्या. 28 वर्षीय नरिंदर कौर भराज यांनी आज पक्षाचे कार्यकर्ता मनदीप सिंग लाखेवाल यांच्याशी विवाह केला. पटियालाच्या रोरेवाल गावात जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गावातील गुरुद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी डॉ.गुरप्रीत कौर यांचाही सहभाग होता.
काँग्रेसच्या मंत्र्याचा पराभव
नरिंदर कौर भाराज (AAP MLA Narinder Kaur) या सर्वात तरुण (२८ वर्षे) आमदार आहेत. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी संगरूरची जागा जिंकली होती. कौर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय इंदर सिंगला यांचा 38,000 मतांच्या फरकाने पराभव केला. विजय इंदर हे मागील सरकारमध्ये मंत्री होते, त्यानंतरही नरिंदर कौर यांनी त्यांचा पराभव करून विजयाचा झेंडा फडकवला.
कोण आहेत आपचे आमदार नरिंदर यांचे पती मनदीप सिंह?
आमदार नरिंदर कौर यांचे पती मनदीप सिंह लाखेवाल हे भवानीगडमधील लाखेवाल गावचे रहिवासी आहेत. मनदीप यांची गणना आपच्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये होते. संगरूर विधानसभेत मीडिया प्रभारी म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. शेतकरी कुटुंबातील मनदीप सिंह लाखेवाल यांनी गेल्या निवडणुकीत नरिंदर कौर यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. नरिंदरच्या विजयात त्यांची भूमिका मोठी मानली जात आहे. आज दोघे एकत्र झाले आहेत.