नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकीत अभाविपचे उमेदवार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदी निवडून आले आहेत. तर सचिव पद काँग्रेसशी संलग्न एनएसयूआयकडे गेलं आहे. अभाविपचं अंकिव बसोया अध्यक्ष, तर शक्ती सिंह उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. ज्योती चौधरी संयुक्त सचिव म्हणून काम बघणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनएसयूआयचे आकाश चौधरी यापुढे सचिव पदाचा भार स्वीकारतील. दरम्यान मतदान यंत्रात मोठ्याप्रमाण घोळ करण्यात आल्याचा आरोप निवडणूकीच्या दिवशी करण्यात आला. त्यानंतर निवडणूक पुन्हा घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.


गेल्या दोन वर्षापासून चारही जागांवर अभाविपचे उमेदवार निवडून येत असल्यामुळे अभाविपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. परंतु यंदा एनएसयुआयने अभाविपकडून 1 जागा पटकावली. मागच्या वर्षी आपची विद्यार्थी आघाडी निवडणुकीत उतरली होती पण त्यांचा दारुण पराभव झाला होता. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा निकाल शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या निकालांकडेही सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.