मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात शेळीपालन व्यवसायाकडे अनेकजण वळत असल्याचे बघायला मिळते. खासकरून सुशिक्षित तरूण मंडळी या व्यवसायाकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकेच काय तर अनेक गलेलठ्ठ पगारांची नोकरी करणारे तरूण नोकरी सोडून हा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाला वाढत असलेला प्रतिसाद पाहून शासनही अनेक योजना काढत आहेत. मात्र या व्यवसायाबद्द्ल तरूणांमध्ये अनेक गैरसमजही पसरत आहेत. या व्यवसायात भरमसाठ उत्पन्न मिळतं असाच समज परसताना दिसतो. उत्पन्न तर आहेच पण त्याची आकडेवारी चुकीची फिरत आहे. शेळीपालनातून खरंच किती आणि कसं उत्पन्न मिळतं हेच आज आपण जाणून घेऊया...शेळी पालनातून मिळणा-या उत्पन्नांबद्दल खालील दोन व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.



शेळयांच्या जाती भारतात शेळयांच्या प्रमुख २५ जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल, उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. या उलट विदेशी जातीच्या शेळया उदा. सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.