AdaniEnterprises Adani Group Shares :  आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांना  जबरदस्त झटका देणारी घडामोड शेअर मार्केटमध्ये घडली आहे.  एका दिवसात अदानी यांचे तब्बल 489,99,30,00,000 कोटींचे नुकसान झाले आहे. Hindenburg रिसर्चने जाहीर केलेल्या पत्रकात अदानी ग्रुपने (Adani Group) शेअर  मार्केटमधील (Share market) आकडेवारीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर असलेल्या  कर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. हा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर धडाधड कोसळले आहे. अदानी ग्रुपच्या कोट्यावधींच्या शेअर्सचा चुराडा झाला आहे. 


Hindenburg च्या अहवालामुळे खळबळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉरेंसिक फाइनेशियल रिसर्च फर्म Hindenburg ने जाहीर केलेल्या रिपोर्टनंतर अंदानी ग्रुप चर्चेत आला आहे. या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे.या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अदानी ग्रुपच्या 7 मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्य 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर आहे. या कंपन्यांमध्ये सर्व पदे भरलेली नाहीत तसेच कंपन्यांच्या कारभारावरच बोट ठेवण्यात आले आहे. 
अदानी ग्रुपने शेअर मार्केटमधील आकडेवारीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. अदानी ग्रुपने शेअर मार्केटमध्ये बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत. या रिपोर्टनंतर एकच खळबळ उडाली. हा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले आहेत.  एका दिवसात अदानी यांचे 46,086 कोटीचे नुकसान झाले आहे. 


 


अदानींचे शेअर्स गडगडले


अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अलीकडेच अदानी ग्रुपने अंबुजा सिमेंटचे शेअर्स विकत घेतले होते. मात्र. हे शेअर्स  9.6 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. दुसरीकडे, अदानी पोर्ट्सचा साठा 7.2 टक्क्यांनी घसरला आहे. एवढंच नाही तर एसीसी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, एनडीटीव्ही या अदानी ग्रुपच्या इंतर कंपन्यांचे शेअर्स देखील 5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. 


हे वर्ष अदानी यांच्यासाठी काहीसे अनकलकी ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पडझड पहयला मिळाली. याचा थेट फटका अदानी यांच्या संपत्तीला बसला आहे. अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. यामुळे जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत अदानी यांचे स्थान आणखी खाली घसरले आहे.  फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांचे  $6.1 बिलियन म्हणजेच 489,99,30,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. 


अदानी यांची संपत्ती एका दिवसात 489,99,30,00,000 रुपयांनी घसरली आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण झाली, त्यामुळे त्यांची नेट वर्थही घसरली  आहे. फोर्ब्सच्या यादीत अदानी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती $120.5 अब्ज इतकी झाली आहे.