Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा! म्हणाले, `ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही...`
Train Accident In Odisha: शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक डागडुजीनंतर तब्बल 51 तासांनी सुरु करण्यात आली आहे.
Adani Group Annoucment After Odisha Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यामधील शुक्रवारी बाहानगा स्टेशनजवळ झालेल्या भीषण ट्रेन अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मृतांना 10 लाख रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. तर जखमींनाही मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानींनेही (Gautam Adani) या अपघातानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. या भीषण अपघात ज्या मुलांचे आई-वडील मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी (Education Of Children Who Lost Parents In Odisha Train Accident) अदानी समूह (Adani Group) घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा स्वत: गौतम अदानी यांनी ट्वीटरवरुन केली आहे.
नेमकं घडलं काय?
इलेक्ट्रीक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसचा (Coromandel Express)अपघात झाला. ही गाडी लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या गाडीचे डब्बे बाजूच्या ट्रॅकवर पडले आणि यशवंतपुर एक्सप्रेसने (Bengaluru-Howrah Superfast Express) या डब्ब्यांना धडक दिली. या अपघातामध्ये 1100 हून अधिक जण जखमी झाले असून 275 जणांचा मृत्यू झाला आहे. 1995 नंतरचा हा भारतामधील सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला आहे. या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात असतानाच आता अदानी समुहाने या अपघामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी मोठी घोषणा केली आहे.
अदानी ट्वीटरवरुन काय म्हणाले?
गौतम अदानींच्या ट्वीटर हॅण्डलवरुन रविवारी दुपारी 4 च्या सुमारास एक ट्वीट करण्यात आलं आहे. "ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही सर्व फार दुखावलो आहोत. ज्या लहान मुलांनी या अपघातामध्ये आपले आई-वडील गमावले आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च अदानी समूह करेल असा निर्णय आम्ही घेतला आहे. या अपघातामधील पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांना तसेच मुलांना उज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करुन देणे हे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे," असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
सेहवागकडूनही घोषणा
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही या भीषण अपघातामध्ये मरण पावलेल्या प्रवाशांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. "या दुख:द प्रसंगी मी किमान या अपघात मरण पावलेल्या व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारु शकतो. सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमधील बोर्डींग सुविधेसहीत शिक्षण मोफत देण्याची सुविधा मी उपलब्ध करुन देईन," असं सेहवागने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?
शुक्रवारी झालेल्या या अपघातानंतर 51 तासांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्वव्रत झाली आहे. देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे स्वत: या ठिकाणी तळ ठोकून होते. 51 तासांनंतर वाहतूक सुरु झाल्यावर वैष्णव यांनी गाडीला नमस्कार करुन मृतांना श्रद्धांजली वाहिली.