Adani Group vs Hindenburg :  आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी ग्रुपने (Adani Group) शेअर मार्केटमध्ये (Share market) फेरफार केल्याचा गंभीर आरोप  आरोप करण्यात आला आहे. हिंडनबर्ग (Hindenburg )शॉर्ट सेल रिसर्च या कंपनींन अदानी समूहाच्या एकूणच व्यवहारांमध्ये गोलमाल असल्याचा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. तेव्हापासून अदानी समूहाचे शेअर तर कोसळले आहेत. तर, जगातल्या श्रीमंतांच्या यादीत अदानींची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.  हिंडेनबर्गच्या अहवालानं मोठा फटका बसला आहे. रिपोर्ट जाहीर झाला तेव्हा 24 तासात अदानी ग्रुपला 489,99,30,00,000 कोटींचा फटका बसला बोता. यानंतर आता एका दिवसात अदानी ग्रुपच्या 80हजार कोटींचा चुराडा झाला आहे. 


अदानी ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानी ग्रुपच्या 7 मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्य 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर आहे. या कंपन्यांमध्ये सर्व पदे भरलेली नाहीत. अनेकांना कंपन्यांमध्ये नियमबाह्य पद नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच कंपन्यांच्या कारभारावरच बोट ठेवण्यात आले आहे. अदानी ग्रुपने शेअर मार्केटमधील आकडेवारीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. अदानी ग्रुपने शेअर मार्केटमध्ये बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत.


हिंडेनबर्गने अदानी ग्रुपला विचारलेले 88 प्रश्न कोणते?


हिंडेनबर्गने ट्विटरवर अहवाल जाहीर केल्यानंतर अदानी समूहाने अहवालात थेट उपस्थित केलेल्या 88 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. यामुळे अदानी ग्रुपच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गौतम अदानी यांचे धाकटे भाऊ राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात दस्तऐवज आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे. हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचे मेहुणे समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले, असे जवळपास 88 प्रश्न हिंडनबर्ग रिसर्च एजन्सीने अदानी समूहाला विचारले आहेत. या प्र्शनांची उत्तरले अदानी ग्रुपने दिलेली नाहीत. 


अदानी ग्रुपची आरोपांवर प्रतिक्रिया


अदानी ग्रुप ने  Hindenburg चा अहवाल बोगस असल्याचे म्हटले आहे.  हिंडेनबर्गच्या अहवाल तथ्यहीन आहे. अदानी एक्झिक्युटिव्हजच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी झालेल्या बाँडधारकांनी ही माहिती दिली.  अदानी समूह याप्रकरणी हिंडेनबर्ग रिसर्चवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अदानी समूहाने खटला भरल्यास आम्ही कंपनीच्या कागदपत्रांची मागणी करू असे हिंडेनबर्गने म्हटले आहे.


Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप


Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप पहायला मिळाला.  सेन्सेक्स जवळपास एक हजार अंकांनी कोसळला. प्रामुख्यानं अदानी समूह आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये झालेल्या तूफान विक्रीमुळे आज राष्ट्रीय आणि मुंबई या दोन्ही शेअर बाजारांचे निर्देशांक कोसळले आहेत. सेन्सेक्समध्येही गेल्या दोन सत्रात 1500 पेक्षा अधिक अंक गमावले आहेत. गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान झाले. गेल्या चार वर्षात वारेमाप नफा कमावून देणारे अदानी समूहाचे शेअर्स गेल्या दोन सत्रात जोरदार आपटले आहेत. उद्योगपती गौतम अदानींच्या एकूण संपत्तीवरही या पडझडीचा खूप मोठा परिणाम झालाय. समूहाला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं आहे त्या बँकांचे शेअर्सही कोसळले आहेत.


हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्च कंपनी नेमकी आहे तरी काय?


2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीची स्थापना केली. हिंडेनबर्गने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. 6 मे 1937 रोजी झालेल्या हायप्रोफाइल हिंडेनबर्ग एअरशिप क्रॅशवरून कंपनीचे नाव देण्यात आले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी अनेक बड्या कंपन्यांमध्ये होणारे घोटाळे बाहेर काढते. या घोटाळ्यांचा अहवालच ही कंपनी प्रकाशित करते. ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते.