मुंबई : नुकतेच, अदानी इंटरप्रायजेस लिमिटेडने एका बड्या मीडिया हाऊसमध्ये भागिदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी अदानी ग्रुपच्या (Adani Group) वीसीपीएलने स्टॉक एक्सचेंजला सुचित केलं. अदानी ग्रुप (Adani Group) त्या बड्या मीडिया हाऊसमध्ये  29.18 टक्क्यांची भागीदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या बड्या कंपनीने यासाठी नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असताना, त्या बड्या मीडिया हाऊसच्या ऑफिशिअल वेबसाईटवर असं सांगण्यात आलं आहे की, कोणतीही चर्चा आणि सहमतीच्या नोटीसीशिवाय 29 टक्क्यांची भागीदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. पण या बातमीला त्या मीडिया हाऊसने नकार दिला आहे.



एनडीटीव्हीच्या (NDTV) शेअरमध्ये आली तेजी


प्रत्येकी 249 रुपयांच्या किंमत असलेले शेअर एनडीटीव्हीमध्ये 26 टक्क्यांपर्यंत भागीदारीसाठी एक खुली घोषणा केली आहे. एनडीटीव्हीचा शेअर मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या तेजीने  376.55 रुपयांवर थांबला होता.


एनडीटीव्हीचे (NDTV) 26 टक्के शेअर खरेदीसाठी जाहीर प्रस्ताव स्टॉक एक्सचेंच्या अंतर्गत केला आहे.


'ऑफर निर्धारित किंमतीपेक्षा जास्त आहे'


कंपनी अधिग्रहण करणाऱ्या घटकांच्या वतीने ऑफरचे व्यवस्थापन करत आहे. "ऑफरची किंमत SEBI (SAST) नियमांच्या नियमन 8(2) नुसार निर्धारित किंमतीपेक्षा जास्त आहे," ऑफरमध्ये म्हटले आहे.


 


एनडीटीव्ही ग्रुपचे तीन चॅनल्स आहेत. हिंदी, इंग्रजी आणि एक बिझनेस चॅनल आहे. यूट्यूबवर एनडीटीव्ही ग्रुपचे कोट्यावधी सब्सक्राइबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, एनडीटीव्ही ग्रुपची एकुण नेटवर्थ जवळपास 2400 कोटी रुपये आहे.


एनडीटीव्ही ग्रुपचे तीन चॅनल्स आहेत. एक हिंदी भाषेत, एक इंग्रजी भाषेत आणि एक बिझनेस चॅनल आहे. यूट्यूबवर एनडीटीव्ही ग्रुपचे कोट्यावधी सब्सक्राइबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, एनडीटीव्ही ग्रुपची एकुण नेटवर्थ जवळपास 2400 कोटी रुपये आहे.