नवी दिल्ली : एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता इतर शहरात गेल्यावर बॅंकेच्या व्यवहारासाठी लागणारी ओळखपत्राची कटकट संपणार आहे. आधार कार्डवरील पत्ताच याआधी ग्राह्य धरला जात असे मात्र आता आधार कार्डवरील पत्त्याशिवाय इतर ओळखपत्रांवरील पत्ताही ग्राह्य धरण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अर्थमंत्रालयाकडून प्रिव्हेंशन ऑफ मनिलाँड्रींग रुल २००५ या कायद्यातील तरतुदीत बदल केले आहेत. याचा फायदा सामान्यांना होणार आहे. आधार कार्डवर असलेल्या पत्त्या व्यतिरिक्त इतर ओळखपत्रावरील पत्ता केवायसीसाठी ग्राह्य धरला जाईल. आधार कार्डवर असलेल्या पत्त्याशिवाय दिलेल्या इतर पत्त्यावर बँक अकाऊंट उघडता येईल. नवीन पत्ता एका कागदावर लिहून तो सेल्फ अॅटेस्टेड करावा लागेल.