आदित्य L 1 ला मोठे यश! गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच दिली आनंदाची बातमी
Aditya L1 Mission: आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Aditya L1 Mission: गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशीच आदित्य एल-1 देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे. आदित्य एल 1 मंगळवारीच पाचव्यांदा आपली कक्षा बदलणार आहे. मात्र, त्याआधी सोमवारी आदित्य-एल1 मिशनबाबत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य-L1 मिशनबाबत नवीन अपडेट दिले आहे. आदित्य-L1 ने वैज्ञानिक डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याची माहिती इस्रोने दिली आहे. ISRO ने X वर एक पोस्ट केली आहे. आदित्य-L1 मध्ये स्थापित केलेल्या STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50 हजार किमी पेक्षा जास्त अंतरावर सुपर-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजणे सुरू केले आहे, अशी माहिती यात देण्यात आली आहे.
आदित्य-एल1 जो डेटा गोळा करेल तो शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करेल, असे इस्रोचे म्हणणे आहे. ही आकृती एका युनिटद्वारे एकत्रित केलेल्या ऊर्जावान कण वातावरणातील फरक दर्शवते, असे सांगण्यात आले आहे.
आदित्य एल-1 हे 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याचे रहस्य समजण्यास मदत होणार आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर सर्वांच्या नजरा आदित्य एल 1 कडे लागल्या आहेत.