Aditya L1 Latest News: भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आदित्य एल-१चे प्रक्षेपण शनिवारी २ सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून करण्यात आले. आदित्य एल-1 हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणार आहे. आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणानंतर रविवारी इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे. रविवारी आदित्य एल-१ने पृथ्वीची पहिली कक्षा बदलली आहे. तर, आता आदित्य एल-१ पृथ्वीची पहिला कक्षा बदलून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आदित्य एल-1 हा उपग्रह 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे. त्यानंतर 110 दिवसांनंतर सूर्याकडे जाणारा त्याचा प्रवास सुरू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य एल-1 या 16 दिवसांत पाचवेळी पृथ्वीची कक्षा बदलणार आहे. यानंतर थ्रस्टर फायर केले जाणार आहे. त्यानंतर आदित्य एल-1 पुढे प्रवास करणार आहे. यापुढे आता 5 सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, सूर्य मोहिम आदित्य एल-१या पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत जाण्याची प्रक्रिया पाच सप्टेंबर 2023 रोजी घडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री उशीरा साधारण तीन वाजता ही प्रक्रिया होणार आहे. 


आदित्य एल-1 235 x 19500 किलोमीटरच्या कक्षेतून बाहेर पडून 245km x 22459 kmच्या कक्षेत पोहोचले आहे. आदित्य एल-1 चे हे सगळ्यात मोठे यश असून आता सूर्याकडे पोहोचण्यांचा मार्ग अधिक जवळ झाला आहे. 


आदित्य L-1 आता पुढील चार महिन्यांत सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून L1 पॉइंटवर पोहोचेल. हे पृथ्वीपासून सूर्याच्या अंतराच्या फक्त 1% आहे. अनेक कोटी किलोमीटर दूर असताना आदित्य सूर्याचा अभ्यास करणार आहे. 


दरम्यान, आदित्य एल-१चा प्रवास हा पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यातील पहिला टप्पा हा PSLV रॉकेटचे लाँचिंग असणार आहे. दुसरा टप्पा ऑर्बिट एक्स्पांशन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आदित्यला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर सोडण्यात येईल. चौथा टप्पा हा क्रूज फेज असेल, यामध्ये आदित्य अंतराळात प्रवास करेल. पाचव्या टप्प्यात आदित्यला L1 पॉइंटवर असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येईल.



आदित्य एल-1 खरंच सूर्यावर जाणार का?


आदित्य एल-१ उपग्रह खरंच सूर्यावर जाणार का अशा प्रश्न अनेकांना सतावत आहे. पण खरंतर आदित्य उपग्रह हा सूर्यावर जाणार नसून सूर्याचा लांबूनच अभ्यास करणार आहे. पृथ्वीपासून 15 किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवरुन आदित्य सूर्याचा अभ्यास करणार आहे.