पाटणा : युवासेनाप्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज (23 नोव्हेंबर) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर (Bihar) आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.  या दोन्ही राजकीय वारसा असलेल्या आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झालीय. भाजपने या भेटीवरुन दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केलाय. भाजपने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन हा हल्लाबोल केलाय.  (aditya thackeray bihar tour yuvasena chief meets to bihar dcm tejasavi yadav politcs news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचं शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती देत स्वागत केलं. तसेच आदित्यसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. यावेळेस आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी याही होत्या.



भेटीवरुन भाजपचा निशाणा


भाजपने या भेटीवरुन दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केलाय. भाजपने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन हा हल्लाबोल केलाय.  भाजप बिहारमध्ये विरोधी पक्षात आहे. यादव-ठाकरे भेटीवरुन भाजप प्रवक्ता आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री निखिल आनंद यांनी हल्ला चढवला.