मनी लाँड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही होणार चौकशी?
उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री, नातेवाईक आणि त्यांचे लागेसंबंध असणारे कॉन्ट्रॅक्टर असा एकूण २६ जणांवर आरोप केले. त्यातील अनेक जण जेलमध्ये आहेत.
नवी दिल्ली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांच्या बिल्डिंगचा टॅक्स सरकारने माफ केला. मंत्री मंडळाच्या बैठकीत तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला. म्हणजेच ती बिल्डिंग अनधिकृत असल्याचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे हे सरकार माफिया सरकार असल्याचा पुनरुच्चार भाजप खासदार किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांनी केला.
ठाकरे सरकारवर मी एकूण २६ आरोप केले होते. त्यातील ८ प्रकरणामध्ये ठाकरे सरकारला ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे लागले किंवा त्याचे पैसे परत करावे लागले आहेत. तर बाकीच्या १८ प्रकरणांमध्ये कारवाई चालू आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत ( Sanjya Raut ) यांची मालमत्ता जप्त झाली. खासदार भावना गवळी ( Bhavna Gavli ) यांच्यावर कारवाई झाली. श्रीधर पाटणकर ( Shridhar Patankar ) याची प्रॉपर्टी जप्त झाली. रश्मी ठाकरे ( Rashmi Thackarey ) यांच्या १९ बंगल्याचे इन्वेस्टिगेशन सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे अनेक पार्टनर जेलमध्ये आहेत. मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ), नवाब मलिक ( Navab Malik ) जेलमध्ये आहेत. हे मी भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली त्याचे यश आहे.
उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री, नातेवाईक आणि त्यांचे लागेसंबंध असणारे कॉन्ट्रॅक्टर असा एकूण २६ जणांवर आरोप केले. त्यातील अनेक जण जेलमध्ये आहेत. आता ७ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरे ( Aditya Thackarey ) यांचीही चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेलच असेही सोमय्या म्हणाले.