“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;` आफताबचं पोलिसांना Open challenge
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याला पोलिसांनी अटक करून जवळपास 24 दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही या प्रकरणात अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. असे असताना आफताबने आता तर थेट दिल्ली पोलिसांनाचं खुले आव्हान केले आहे.
क्रूरकर्मा आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याने (Aftab) श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिची गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, हा प्रकार अत्यंत वेदनादायी आहे. आफताब पूनावाला याची अलीकडेच नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीनंतर आफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे.
हेसुध्दा वाचा : गुजरातमध्ये कोण मारणार बाजी?
या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी (delhi police) आफताबला अटक केली असली तरी आफताब दररोज नवनवीन खुलासे करत आहे. आता तर आफताबने पोलिसांकडे खुनाची कबुली देताना म्हणाला की, “होय, मी श्रद्धा वालकरचा खून केला आहे. तिच्या मृतदेहाचे तुकडे आणि खून करण्यासाठी वापरलेलं हत्यार शोधून दाखवा, असं आव्हान तुम्हाला देतो.” (Shraddha Walkar Murder Case )
आफताबने दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांना हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचे आव्हान दिलं आहे. त्याने श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याबाबत ही पोलीसांसमोर व्यक्त झाला आहे. यापूर्वी आफताबने त्याच्या गुरुग्राम कार्यालयाजवळील झाडीत खुनासाठी वापरलेलं हत्यार फेकल्याचे सांगितलं होतं.