Shraddha Walker case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. आरोपी आफताब पूनावालाने (aftab poonawalla) श्रद्धाची हत्या करत तिच्या शरीराचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. त्यानंतर आता पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या तपासात आफताबबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आफताब वारंवार श्रद्धाला मारहाण करत असल्याचे समोर चौकशीतून समोर आले आहे. दिल्ली पोलिसांचे पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईतही आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने आफताबबाबत महत्त्वाचा खुलासा केलाय. श्रद्धाने आपली भेट घेतली होती असे सामाजिक कार्यकर्त्या पूनम बीडलाल यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये आफताबने श्रद्धाला मारहाण केल्यानतंर मित्र राहुल राय हा तिला पूनम बीडलाल यांच्याकडे घेऊन आला होता. यावेळी घडलेला प्रसंग पूनम यांनी सांगितला आहे. आफताब हा श्रद्धाला नॉन व्हेज खान्यावरून बेदम मारहाण करत करत होता असा खुलासा पूनम बिडलाल यांनी  केला आहे.


"नोव्हेंबर 2020 मध्ये श्रद्धा माझ्याकडे आली होती. तिच्या सोबत राहणारा आफताब तिला मारहाण करायचा. त्या दिवशीही मी तो का मारतो असे विचारले तर नॉन व्हेज खाल्ले नाही म्हणून आफताब मारायचा असे श्रद्धाने सांगितले. मला जबरदस्तीने नॉन व्हेज खायला घालून मारहाण करायचा असेही श्रद्धाने मला सांगितले. जेव्हाही त्याला राग यायचा तो मला मारहाण करायचा आणि मग घरी यायचा नाही. त्यानंतर त्याचे आई वडील येऊन आफताबच्या वतीने श्रद्धाची समजूत घालायचे. पण वारंवार तो मारहाण करतच होता," असं पूनम यांनी सांगितलं.


"मी तिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले होते. ती मला माझ्या घरी थांबायला सांगितले पण ती थांबली नाही. संध्याकाळी फोन करुन मी नाही येऊ शकत असे तिने सांगितले. त्यानंतर आफताबचे आई-वडील घरी आले होते आणि त्यांनी तो पुन्हा असे करणार नाही असे त्यांनी सांगितल्याचे श्रद्धा म्हणाली," असेही पूनम म्हणाल्या.