अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट नागपूर :  मुंबईत कोरोनाची भीती अजूनही पूर्णपणे संपलेली नाही, तोच आता आणखी एका नव्या व्हायरसचा धोका समोर आला आहे. आता RS नावाच्या नव्या व्हायरसनं एन्ट्री केली आहे. काही देशांमध्ये या व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं बोललं जातंय. त्यातच आता आणखी एक नवा धोका समोर आलाय. तो म्हणजे रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस म्हणजेच RS व्हायरस.



सध्या अमेरिकेत हा व्हायरस धुमाकूळ घालतोय आणि या व्हायरसचा धोका लहान मुलांना सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. या RS व्हायरसमध्ये फ्लू सारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी याची लक्षणं दिसतात.


अमेरिकेत गेल्या दोन महिन्यांपासून RS व्हायरसच्या रुग्णांमध्ये तब्बल १४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही RS व्हायरसचे रुग्ण सापडू लागलेत. अनलॉकच्या प्रक्रियेत आता सर्वत्र शाळा उघडण्याची तयारी सुरू झाली आहे. अशा वेळी सरकार आता शाळा उघडण्यासाठी पुढे टाकलेलं पाऊल मागे घेईल का? हे आता पाहावं लागणार आहे.