भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होताच समोर आले व्हिडीओ
BJP MP Viral Video : भाजपने निवडणुकीची यादी जाहीर करताच भाजपच्या एका खासदाराचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कथित व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप खासदार एका परदेशी महिलेसोबत असल्याचे म्हटलं जात आहे. याप्रकरणी खासदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. मात्र आता उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजप खासदाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या या खासदाराचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खासदाराने तक्रार दाखल केली असून आपल्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचे म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशचे बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एका विदेशी महिलेसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बाराबंकी मतदारसंघातून पुन्हा एकदा उपेंद्र सिंह रावत यांना तिकीट दिले आहे. रावत यांच्या तिकिटाची घोषणा झाल्यापासून त्यांचा हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केले आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कथित व्हायरल व्हिडीओमध्ये खासदार वेगवेळगळ्या तारखांना हॉटेलच्या खोलीत परदेशी महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. या सात व्हिडिओ क्लिप आहेत ज्याची प्रत्येकाची वेळ पाच मिनिटे आणि एक सेकंद आहे. सीसी कॅमेऱ्याने हे व्हिडिओ बनवण्यात आल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, मला बाराबंकीमधून पक्षाचे तिकीट मिळताच माझ्या विरोधकांनी हे कृत्य केले आहे. ही क्लिप खोटी आहे. लवकरच आरोपींचा शोध लागेल, अशी आशा खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी उपेंद्रसिंह रावत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ एआयद्वारे बनवण्यात आला असून हा व्हिडीओ एडिट करण्यात आल्याचे रावत यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ व्हायरल करून माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उपेंद्र सिंह रावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून निष्पक्ष तपास करण्याची मागणी रावत यांनी केली आहे. या व्हिडीओमध्ये मी नसून माझा चेहरा एआयच्या माध्यमातून वापरण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. हे व्हिडिओ 2022 आणि 2023 चे असल्याचेही रावत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची बोचरी टीका
या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसने बोचरी टीका केली आहे. "नड्डा जी, बाराबंकीचे भाजप खासदार उपेंद्र रावत यांची 'व्हायरल टॅलेंट' पाहून पुन्हा लोकसभेचे तिकीट? CV सोबत CD पण पाहिली होती का??," असा सवाल काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उपेंद्र सिंह रावत यांनी बाराबंकी मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या राम सागर रावत यांचा पराभव केला होता. यापूर्वी 2014 मध्ये भाजपच्या प्रियांका सिंह रावत यांनी येथून निवडणूक जिंकली होती.