कोलकाता : जेएनयू (JNU) मध्ये करण्यात आलेल्या फी वाढीनंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन काही शांत होण्याचं नाव घेईना... यातच आता कोलकातामध्येही एका महाविद्यालयात फी वाढीवरून गदारोळ माजलाय. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताच्या दक्षिणेश्वरच्या हिरालाल मजूमदार मेमोरियल वुमन्स कॉलेज  (Hiralal Majumdar Memorial College for Women) मध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांनी फी वाढीवरून जोरदार हंगामा केला. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात तोडफोडही करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविद्यालयाच्या वार्षिक फीमध्ये वाढ झाल्याचं समजल्यानंतर काही विद्यार्थिनी प्राचार्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी, प्राचार्यांशी त्यांचा वाद झाल्यानंतर या विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरात तोडफोड सुरू केली. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयात प्रत्येक तीन महिन्यानंतर फी वाढ लादली जातेय. 



प्राचार्यांनी मात्र विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळून लावलेत. संपूर्ण वर्षभराची फी एकदाच न घेता तीन-तीन महिन्यांच्या अंतरानं घेतली जाते... प्रॉस्पेक्टसमध्ये उल्लेख केल्याप्रमाणेच ही फी आकारली जात असल्याचंही प्राचार्यांनी म्हटलंय.