Centipede Found in Ice Cream:गेल्या काही दिवसांपासून आइस्क्रीम हा चर्चेचा विषय ठरतोय.मुंबईतील एका व्यक्तीला आइस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर असाच काहीसा प्रकार नोएडामध्येही घडला आहे. नोएडातील एका महिलेने ऑनलाइन आइस्क्रीम ऑर्डर केले होते. मात्र, आइस्क्रीमचा डब्बा उघडताच तिला धक्काच बसला. या प्रकाराने घरातही एकच गोंधळ उडाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला नोएडा सेक्टर 12 मध्ये राहते. शनिवारी सकाळी तिने ब्लिंकिटवरुन आइस्क्रीम ऑर्डर केले होते.तिने जसं आइस्क्रीमच्या डब्याचे झाकण उघडले तर आत तिला एक आइस्क्रीममध्ये किडा चालताना दिसला. हा प्रकार पाहून घरातच गोंधळ निर्माण झाला.आइस्क्रीममध्ये असलेला किडा म्हणजे गोम होता. त्यानंतर पीडित महिलेने ज्या अॅपवरुन ऑनलाइन आइस्क्रीम मागवलं होतं तिथे तक्रार केली. मलाडमध्ये आइस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर लगेचच हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


नोएडा सेक्टर 12मध्ये राहणारे दीपा यांनी सांगितले की, उन्हाळा असल्याने मुलांनी आइस्क्रीम खाण्याचा हट्ट धरला. म्हणून त्यांनी195 रुपये किमत असलेले अमूलचा व्हॅनिला पॅक खरेदी केला. मात्र, जेव्हा त्यांनी तो उघडून बघितला तेव्हा त्यात किडा वळवळताना दिसला. हा किळसवाणा प्रकार पाहून त्या घाबरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लगेचच फुड डिलिव्हरी अॅपला तक्रार केली. त्यानंतर त्यांना आइस्क्रीमचे पैसे रिफंड मिळाले. 


तक्रार दाखल


या घटनेनंतर कस्टमर केअरने या प्रकरणी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अमूलचे मॅनेजर या प्रकरणी संपर्क करतील. मात्र, अद्याप अमूलकडून कोणताही रिप्लाय आला नाहीये. या प्रकरणाची माहिती मिळताच एफडीएच्या पथकाने सेक्टर 22मध्ये असलेल्या डिलिव्हरी अॅपच्या स्टोअर सील केले आहे. तसंच, सर्व प्रकारच्या आइस्क्रीमवर बंदी घातली आहे. तसंच, आइस्क्रीम कंपनी आणि डिलिव्हरी अॅपविरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते, असं एफडीएने म्हटलं आहे. 


दरम्यान, मुंबईतील मालाड येथेही ब्रेंडन फेराओ यांनी ऑनलाईन डिलेव्हरी अॅपमधून घरी आईस्क्रिम मागवलं. मात्र आईस्क्रिमचा पॅक फोडल्यानंतर त्यांना त्यामध्ये चक्क २ इंच लांबीचा मानवाच्या बोटाचा तुकडा आढळून आला होता.ब्रेंडन फेराओ यांनी इन्स्टाग्रामवर यम्मो कंपनीला टॅग करत पोस्ट शेअर केली. इतकंच नव्हे तर त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आईस्क्रिम तयार करणा-या कंपनीची चौकशी सुरु केली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी बोटाचा तुकटा प्रयोगशाळेत पाठवला आहे. पोलिसांनी यम्मो कंपनीवर गुन्हा केली आहे. 272, 273आणि 336 आयपीसी अंतर्गत गुन्हा रजिस्टर्ड केला आहे पुढील तपास चालू आहे.