नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. 30 मे ला पंतप्रधान पदाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते जवळच्या देशाला भेट देतील. मालदीव, श्रीलंका किंवा नेपाळ दौऱ्यावर ते जाऊ शकतील अशी शक्यता आहे. पंतप्रधानांची पहिली विदेश यात्रा 14-15 जूनला किर्गिस्तानला असणार आहे. तिथे ते एससीओ समिटमध्ये भाग घेतील. यानंतर 28-29 जूनला पंतप्रधान जपानच्या ओसाकामध्ये जी-20 संम्मेलनात सहभागी होतील. ऑगस्टमध्ये ते विकसित देशांचा समूह जी-7 च्या संमेलनासाठी फ्रान्सला जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सप्टेंबरमध्ये पंतप्रधान रशियाच्या वलादिवोस्टकमध्ये दौरा करणार आहेत. तिथे ते इकोनॉमिक समिटमध्ये भाग घेतील. सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांचा न्यूयॉर्क दौरा आहे. इथे पंतप्रधान जगातील अनेक देशांतील प्रमुखांसोबतच्या बैठकीत सहभागी होतील. मोदींसाठी अमेरिकेतील नेत्यांच्या शुभेच्छा येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित महत्त्वाच्या नेत्यांनी मोदींना शुभेच्छा पाठवल्या आहेत. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे संकेत देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाला मोठ्या विजयाच्या शुभेच्छा असे ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मला आनंद आहे की आपण मिळून आपले काम पुढे सुरु ठेवू असेही ते म्हणाले. 



अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी देखील ट्विट केले आहे. अमेरिकेचे मित्र पंतप्रधान मोदी यांना भारताच्या निवडुकीतील विजयासाठी शुभेच्छा असे ट्विट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी या विजयाला जनतेची प्रतिबद्धता आमि सशस्त अभिव्यक्ती असे संबोधले आहे.