Delhi Metro Viral Video: दिल्लीकरांसाठी लाईफलाईन बनलेल्या दिल्ली मेट्रोवर (Delhi Metro) आता नवी ओळख मिळाली आहे. दिल्ली मेट्रो सध्या पिकनीट स्पॉट झालीये, त्याला कारण मेट्रोमध्ये पहायला मिळणारं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. किसिंग व्हिडिओ, बिकिनी गर्ल व्हिडिओ तसेच ब्युटी पार्लर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर आता दिल्ली मेट्रोमधील एक नवा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे आता प्रवास करावा की नाही? असा सवाल दिल्लीचे नागरिक विचारत असल्याचं दिसतंय. सध्या नवा व्हिडिओ सोशल मीडियावर (Trending Video) ट्रेंडमध्ये असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुणी पोल डान्स करताना दिसत आहेत. ट्रेंडमध्ये असलेला हा व्हिडीओ @HasnaZarooriHai या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. यामध्ये दोन तरुणी मादक अंदाजात पोल डान्स करताना दिसत आहेत. मेट्रोमधील काही तरुणांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला असून सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी तुफान शेअर केला आहे. दोन महिला परवीन बाबी आणि शशी कपूर अभिनीत सुहाग चित्रपटातील 'मैं तो बेघर हूं' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.


पाहा Video



मेट्रोमध्ये अशा कृती करू नका अशा सूचना प्रशासनाद्वारे वारंवार दिल्या जात आहेत. मात्र तरी देखील काही जण प्रसिद्धीसाठी नवनवीन व्हिडिओ आणि रिल्स शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा गोष्टींवर कधी नियंत्रित करणार? असा प्रश्न दिल्लीचे नागरिक विचारताना दिसत आहेत. आतापर्यंत 2 लाख 67 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये अशी कामं करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी किंवा किमान आर्थिक दंड तरी आकारावा अशी मागणी केली जात आहे.


आणखी वाचा - चेला असावा तर असा! गुरूसाठी ऋषभ पंतने केलं खास सेलिब्रेशन; म्हणतो 'आप तो हो नहीं पर...'


दरम्यान, दिल्ली मेट्रो कपलसाठी अश्लील चाळे (obscene Video) करण्याचा अड्डा झालाय, त्यामुळे आता दिल्ली पोलीस गस्त घालणार असण्याचं सांगण्यात आलंय. डीएमआरसीने याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडवर आली आहे. मात्र कारवाई कधी होणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.