Ayodhya Ram Mandir : अयोध्येत तब्बल 500 वर्षांनी श्रीरामाचं आगमन झालं. नवीन भव्य आणि सुरेख अशा मंदिरात रामलल्लाची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मोहन भागवतही गर्भगृहात उपस्थितीत होते. देशभरात दिवाळाची वातावरण होतं, अख्खा देश एका रंगात राममय झाला होता. आपल्या लाडक्या श्रीरामाला पाहण्यासाठी प्रत्येक देशवासीय उत्सुक होता. तो क्षण आला अन् त्याचं सावळ, लोभस रुप पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला. जगाचा विसर पडेल असं त्याचं रुप पाहून अनेकांचे डोळे पाणावले. (After Prana Pratishtha Ram Lalla suddenly smiled at everyone and started shaking his head WATCH THE AMAZING VIDEO)


रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालरुपातील श्रीरामाला पाहून कोणाला पंढरपुरातील विठूराया दिसला तर कोणाला तिरुपतीचे बालाजीचं दर्शन झालं. पण या प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर त्यांचं लोभसवाण रुप सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झालं. फोटो आणि व्हिडीओ वाऱ्यासारखं या सोशल मीडियाच्या जगात पसरलं आणि तिथेही एकच रंग दिसला तो रामदिवाळीचा. 


रामलल्लाच्या दर्शनाने प्रत्येक जण आनंदी आणि भरुन पावला होता. कारसेवकांच्या मनातील भावना तर शब्दात सांगणंही कठीण आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे याची दाही याची डोळा पाहण्यासाठी असंख्य मान्यवरांसह बॉलिवूड, खेळजगतातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 


नुकताच सोशल मीडियावर रामलल्लाचा एक व्हिडीओ (Fact Check) सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. ज्यात चक्क रामलल्ला सर्वांना टकामका पाहताना दिसतं आहे. एवढंच नाही तर गोड हसतानागही या व्हिडीओमध्ये रामलल्लाचं हे रुप अगदी मनमोहक आहे. हा व्हिडीओमधील रामलल्लाचं हे जिवंत रुप पाहून प्रत्येक भक्त निशब्द होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण भारावून जाल हे नक्की. 



AI ची कमाल रामलल्ला हसला !


आता तुम्हाला वाटलं असे हे कसं झालं? तर आम्ही तुम्हाला सांगतो हा व्हिडीओ एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म X वर सुनील चौधरी यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. AI यामुळे आपल्या अनेक चमत्कार पाहिला मिळतात. रामलल्लाचा हा व्हिडीओ पाहून भक्त आश्चर्यचकित झाले आहेत.