Zika virus Case Found in karnataka on monday : जगातून आता कुठे कोरोना विषाणूची भीती कमी होताना दिसत आहे. असं असलं तरीही चीन आणि काही राष्ट्रांमध्ये मात्र कोरोनाचं संकट कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, असं असतानाच एक चिंता मिटत नाही तोच दुसऱ्या एका विषाणूनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळं आरोग्य यंत्रणांची चिंता वाढताना दिसत आहे. कारण, आता पुण्यापाठेपाठ कर्नाटकातही झिकाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. रायचूर जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलं. असं असलं तरीही चिंता करण्याची गरज तूर्तास नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 5 डिसेंबरला पुण्यातील लॅबला पाठवलेल्या नमुन्यांचीच चाचणी केल्यानंतर या मुलीला झिकाची लागण झाल्याचं वृत्त हाती आल्याचं के. सुधाकर म्हणाले. दरम्यान यावेळी 2 इतरही नमुनेही चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचं सांगत त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली. 


आरोग्य यंत्रणा सतर्क 


झिकाची लागण झालेला रुग्ण आढळताच रायचूर आणि शेजारी जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संबंधित आजाराचं गांभीर्य पाहता आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देशही आरोग्य यंत्रणांनी दिले आहेत. दरम्यान, सध्या ज्या मुलीला झिकाची लागण झाल्याचं निदान झालं, तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या मुलीनं कोणताही प्रवासही केलेला नाही. सध्यातरी झिकाचा हा पहिलाच रुग्ण असल्यामुळं रुग्णसंख्या वाढू न देणं या गोष्टींना यंत्रणा प्राधान्य देत आहे. 


झिका व्हायरस म्हणजे काय? 
मच्छरमुळं होणारा विषाणूजन्य आजार म्हणजे झिका. एडीज मच्छर चावल्यानं झिकाची लागण होते. हे मच्छर दिवसा जास्त सक्रीय असतात असं सांगण्यात येतं. झिकाची लागण झाल्यास अनेकदा रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. 


हेसुद्धा वाचा : Fact Chek : तुम्ही उभं राहून औषध घेत असाल तर सावधान, आरोग्यास ठरू शकतं घातक?


झिकाची लक्षणं काय? 
आम्हालाही झिकाची लागण होऊ शकते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास आधी याच्या लक्षणांवर एक नजर टाका. झिकाची लागण झाल्यास शरीरावर चट्टे, ताप, डोळे येणं, सांधेदुखी, गोवर, डोकेदुखी अशी लक्षणं दिसू शकतात. अनेकदा झिकाची लागण होऊनही 2 दिवस रुग्णामध्ये कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळं अशा परिस्थितीत 2-7 दिवस रुग्णानं काळजी घेणं कधीही उत्तम