मुंबई : गाडी चालवणे तसे सोपे आहे, परंतु आपल्याकडे समोरील लोकं ज्या पद्धतीने गाडी चालवतात आणि रस्त्यावरील लोकं ज्यापद्धतीने रस्त्यावर फिरतात, हे पाहाता कार चालवणे किंवा ड्रायव्हिंग करणे हे सोपे नाही. भारतीय रस्त्यावर आणि मुळात लोकल रस्त्यावर गाडी चालवायची असेल तर वाहन चालक कुशल आणि संयमी असावा कारण मध्येच रस्त्यात त्याच्यासोबत कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोकं इतक्या निष्काळजीने गाडी चालवतात की, ते केवळ स्वत:चेच नाही तर इतरांचा ही जीव धोक्यात टाकतात.


लोकांच्या निष्काळजीपणामुळे झालेले मोठ मोठ्या अपघाताचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमधील ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग स्किल्स पाहून तुम्ही चक्कीत व्हाल. कारण त्याने ज्या पद्धतीने गाडी चालवली आहे अशी गाडी कोणीच चालवू शकणार नाही.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर सर्वत्र पाणी आहे. एक लॉरी ड्रायव्हर आपली लॉरी चालवत येत असतो तेव्हा अचानक रस्त्यात एक कार  येते आणि तेथेच थांबते. लॉरीला कारला ठोकू नये म्हणून लॉरी ड्रायव्हर पूर्णपणे काळजी घेतो आणि त्याची लॉरी अशी काही वळवतो की, लॉरी कारला ठोकत तर नाही, परंतु तीचा तोल जातो. तुम्हाला हे दृष्य पाहून वाटेल की, आता ही लॉरी खाली पडणारच तेवढ्यात हा लॉरी ड्रायव्हर या लॉरीला पुन्हा संतुलीत करतो आणि आपली लॉरी घेऊन निघून जातो.


हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, केवळ लॉरी ड्रायव्हरच्या कौशल्यामुळेच हा अपघात होता होता वाचला आहे. या ड्रायव्हरची गाडी चालवण्याची ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल. इतक्या कुशलतेनं गाडी चालवायला सगळ्यांनाच शिकायचे असते त्यामुळे हा व्हिडीओ तुम्हाला इंस्पायर तर करेल परंतु हे समजून घ्या की, अशी गाडी चालवणे सगळ्यांनाच जमत नाही त्यामुळे मुद्दाम कोणी याचे अनुकरण करायला जाऊ नका.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Gaddiyan_wale नावाच्या अकाऊंटवरून ही व्हिडीओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. ज्या ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे ते सगळेच या लॉरी ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगचे चाहते बनले आहेत.



लोक हा व्हिडीओ फक्त  एकमेकांसोबत शेअरच करत नाहीत, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील करत आहेत. बऱ्याच लोकांनी असेही म्हटले की, 'हा ड्रायव्हर नासाहून ड्रायव्हिंग शिकून आला आहे असे वाटतेय'. हा व्हिडीओ खरच खूप मजेदार आहे. मात्र, हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत कोणालाच माहिती नाही.