Trending News In Marathi: उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाडेकरुसोबत झालेल्या वादातून भलताच प्रकार घडला आहे. वाद थेट मारामारीपर्यंत पोहोचला त्यानंतर महिलेने जे केले ते पाहून जे परिसरात एकच खळबळ माजली आहे. महिलेने शेजारच्याचा थेट कानच खाल्ला आहे. ही घटना पाहून रहिवाशी चांगलेच हादरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळच्या वेळेत गेटचे टाळे खोलण्याचा वादातून हा सगळा प्रकार घडला आहे. न्यू आग्रा परिसरात नगला पदी देवी नगर परिसरात रविंद्र यादव यांच्या घरात अनेक कुटुंब भाड्याने राहतात. घरात राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचा पेपर होता. भाडेकरु रामवीर त्याच्या ई-रिक्क्षेतून मुलाला सोडण्यासाठी गेले होते. घरातून बाहेर जाण्यासाठी त्यांनी सकाळी 6च्या सुमारास गेटचे टाळे खोलून बाहेर पडला. मात्र यावरुनच त्याचे शेजाऱ्यासोबत भांडण झाले. सकाळी सकाळी गेटचे टाळे खुले सोडल्याने शेजारी राहणाऱ्या संजीव आणि त्याच्या पत्नीने रविंद्र यादव यांना शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. 


रामवीर यांना शिवीगाळ केल्यानंतर संजीवने त्यांचा हाथ पकडला आणि त्याच्या पत्नीने त्याचा कान चावला. महिलेने कडकडून चावा घेतल्यामुळं कानाचे दोन तुकडे झाले. या घटनेनंतर इतरही शेजारी आले. शेजाऱ्यांनी महिलेला कानाचा हिस्सा परत देण्यास सांगितले जेणेकरुन शस्त्रक्रिया करुन पुन्हा तो जोडण्यात येईल. मात्र महिलेने कानाचा तो हिस्सा खाल्ल्याचे सांगितले जाते. याघटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


न्यू आग्रा ठाणे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 325 आणि 506अंतर्गंत एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त अरीब अहमद यांनी म्हटलं आहे की, रामवीर बघेल यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या महिलेने त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाण करुन त्यांच्या कानाचा चावा घेतला. या आरोपानुसार, तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे.