नवी दिल्ली : केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शेतकरी प्रश्नावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषी कायद्यावरून देशातलं राजकारण तापले असताना राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी कायदे हे शेतकऱ्यांना दिलेला मृत्यूदंड आहे अशी टीका राहुल गांधी यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून केली होती. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर चिरडला जात आहे अशी टीका त्यांनी केली होती. राज्यसभेत या कायद्यांवर मतदान घेण्याची मागणी विरोधीपक्षाने केली होती. विरोधी पक्षांकडे संख्याबळ असल्यामुळे सरकारने ही मागणी फेटाळल्याची टीका त्यांनी केली आहे.


कृषी कायदा तातडीने रद्द व्हावीत अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून खासगी कंपन्यांच्या हातचं शेतकरी बाहुलं होतील अशी भीती राहुल यांनी व्यक्त केलीय. देशभरात काँग्रेसने या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनं सुरू केली आहेत. मात्र या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे. 


6\