अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधील (Ahmedabad) वटवा (Vatva) येथे केमिकल फॅक्टरीत आज मंगळवारी मोठी आग (Fire broke ) लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. २० पेक्षा जास्त अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. ही आग रात्री लागली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादच्या वटवामध्ये जीआयडीसी इंडस्ट्रीयल भागात तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली. अहमदाबादचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश भट्ट यांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहने तेथे पोहोचली होती, आता आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, केमिकल गळतीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. 


तीन पैकी एका केमिकल कंपनीत जोरदार स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येते आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीत आत्तापर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.



वापी परिसरातील केमिकल फॅक्टरीत भीषण आग


गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने असल्याने वारंवार आगीच्या घटना घडत असतात. अलीकडच्या काळात गुजरातमधील वापी भागातील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या. त्यावेळी कारखान्यात लोक काम करीत होते ज्यांना आग लागली. आगीची माहिती मिळताच आत काम करणार्‍या लोकांना प्रथम बाहेर काढण्यात आले. वास्तविक, रासायनिक पदार्थ असल्याने ही आग वेगाने पसरत होती. आगीचा भडका उडताना दिसत होता. आजूबाजूचे परिसर रिकामे करण्यात आले. भीषण आगीमुळे आकात धुरांचे लोट दिसत होते. 


 राजकोटच्या कोविड रुग्णालयात आग


गेल्या महिन्यात गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात भीषण आग लागली. या अपघातात सहा रुग्णांचा जळत्या झुडुपेमुळे मृत्यू झाला. आग राजकोटच्या शिवानंद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागली. कोविड रुग्णालय असल्याने रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यावेळी एकूण ११ रूग्ण दाखल झाले होते, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला.