बंगळुरू : तुरुंगात कैद असलेल्या अन्नाद्रमुक नेत्या व्ही के शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. आजारी पतीला भेटण्यासाठी त्यांना शुक्रवारी ही रजा मंजूर करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक तुरुंग अधिकाऱ्यांनी शशिकला यांना पॅरोल मंजूर केलीय. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शशिकला यांनी १५ दिवसांची पॅरोल मागितली होती... परंतु, त्यांना केवळ ५ दिवसांची पॅरोल मंजूर करण्यात आलीय. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी आढळल्यानंतर शशिकला फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. खालच्या कोर्टानं सुनावलेली चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये स्थानिक न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं होतं.


शशिकला यांचे पती लीव्हर आणि किडनी प्रत्यारोपणासाठी सध्या चेन्नईच्या एका हॉस्पीटलमध्ये भरती झालेत. शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दुपारी शशिकला लगेचच बंगळुरूहून चेन्नईसाठी रवाना झाल्यात. तुरुंगाच्या बाहेर शशिकला यांचे हजारो समर्थक जमा झाले होते. 


उल्लेखनीय म्हणजे, शशिकला यांनी यापूर्वीही पॅरोलसाठी अर्ज केला होता. परंतु, गरजेची कागदपत्रं जमा न केल्याचं 'तांत्रिक' कारण देत ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा पहिला अर्ज रद्द करण्यात आला होता. यानंतर शशिकला यांनी तत्काळ पॅरोलसाठी अर्ज केला होता. या अर्जसोबत त्यांनी पतीचं मेडिकल सर्टिफिकेटसहीत इतर महत्त्वाची कागदपत्रंही जोडली होती. त्यानंतरच त्यांना पॅरोल मंजूर करण्यात आलाय.