वर्तमानपत्र वाचताना हृदय विकाराचा झटका, आमदाराचा मृत्यू
आमदार कानगाराज वर्तमानपत्र वाचत असताना अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला.
तामिळनाडू : सत्ताधारी अण्णाद्रमुकचे आमदार आर. कानगाराज यांचा ह्रदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. पार्टी सुत्रांनी ही माहीती दिली. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. जिल्ह्यातील सुलूर विधानसभा क्षेत्रातील आमदार कानगाराज वर्तमानपत्र वाचत असताना अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला.
आमदारांच्या घरी आलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुलतानपेट येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले असून त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री पलानिसामी यांच्या सहित अनेक त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
ते 2016 साली पहिल्यांदा कोयंबटूर जिल्ह्याच्या सुलूरमधून तामिळनाडू विधानसभेसाठी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेस उमेदवार मनोहरन यांना 35 हजार मतांनी हरवले. कानगाराज हे एक शेतकरी होते आणि त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हेगारी प्रकरण नव्हते. याआधी ते कोयंबटूर जिल्ह्यातील पंचायतीचे अध्यक्ष होते.