नवी दिल्ली : 'लव्ह जिहाद' (Love Jihad) विरोधात कायदा बनण्याची चर्चा जोरात आहे. अनेक राज्य सरकारांनी यासंदर्भातील कायदा बनवण्याची इच्छा जाहीर केलीय. काही राज्यांनी मसुदा तयार करण्यास सुरुवात केलीय. लव्ह जिहाद विरोधात कायदा बनवण्यामध्ये सर्वात पहीलं नाव उत्तर प्रदेशचं (Uttar Pradesh) येतं. हरियाणा (Haryana), मध्य प्रदेश  (Madhya Pradesh), कर्नाटक (Karnataka) आणि गुजरात (Gujarat) देखील लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहेत. या दरम्यान एआयएमआयएम (AIMIM) चे मुख्य असदुद्दीन ओवेसींनी महत्वाचे विधान केलंय. लव्ह जिहाद हे संविधान भावनेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. 


भाजपवर निशाणा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


असे असेल तर स्पेशल मेरेज एक्ट (Special Marriage Act) बंद करायला हवा. अशा प्रकारचा कायदा संविधानाच्या कलम १४ आणि २१ च्या विरोधात आहे. कायद्याची गोष्ट करण्याआधी त्यांनी संविधान वाचायला हवे असे ओवेसी म्हणाले. भाजपने तरुणांच्या रोजगार मुद्द्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी हे मुद्दे घेतल्याचा आरोप ओवेसींनी भाजपवर केलाय.


उत्तर प्रदेशमध्ये तयारी 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा याविषयावर प्रतिक्रीया दिली आहे. राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्यावर गंभीर आहे. राज्याच्या गृह विभागाने लव्ह जिहाद विरोधात मसुदा देखील तयार केलाय. पुढच्या कॅबिनेट मिटींगमध्ये यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये यास बेकायदेशीर धर्मांतरण विरोधक बिल नाव दिले जाऊ शकते. यामध्ये दोषी आढळणाऱ्यास ५ ते १० वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान करण्याची तयारी केलीय.