नवी दिल्ली : खाजगी उड्डाण कंपनी इंडिगोच्या कर्मचाऱ्याने प्रवाशावर दादागिरी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर इंडिगोतर्फे त्या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. दरम्यान सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने एका जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्विटरवर एअर इंडियाच्या दोन जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यातील पहिली जाहिरात ही अन्बीटेबल सर्विस (अत्योत्कृष्ठ सेवा) बीट या रंगाला निळे दाखविले आहे. हा निळा रंग म्हणजे इंडिगोचा थीम कलर आहे अशी चर्चा आहे.



तर दुसऱ्या जाहिरातीत एअर इंडियाचे शुभंकर 'महाराजा' आहेत. आपल्या ट्रेडमार्क सोबत एअर इंडियाने एक ओळ ही जोडली आहे.



"आम्ही आपला हात फक्त जोडण्यासाठी पुढे करतो. " 


इंडिगो घटना समोर आल्यानंतर ट्विटरवर अनेकजणांनी हा व्हिडिओ ट्विट केला. युवासेनाअध्यक्ष यांनीही यासंबंधी ट्विट करत जोपर्यंत गुन्हेगारांना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक होत नाही तोपर्यंत या एअर लाईन्सवर उड्डाण निर्बंध घालणे गरजेचे आहे असे सांगितले.



तसेच भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी अशाप्रकारचे अहंकारी वर्तन इंडिगोसाठी किरकोळ गोष्ट असल्याचे म्हटले आहे.


मी नियमित अशा क्रूर घटनांबद्दल ऐकत आलो आहे असेही त्यांनी म्हटले. या दोघांव्यतिरिक्त अनेकांनी यासंबंधी ट्विट करत आपली नाराजी आणि राग व्यक्त केला.




एकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की माझे वयस्कर आई वडिल प्रवास करणार आहेत. पण वरिष्ठ नागरिकांना सुरक्षितता असेल अशा इतर कंपनीच्या विमानांमधून मी त्यांना पाठविणार असल्याचे त्याने लिहिले आहे.