नवी दिल्ली : फ्रॅंकफर्ट जाणाऱ्या एअर इंडिया विमानात शाकाहारी प्रवाशाला मांसाहारी भोजन देण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे संतप्त क्रू मेंबरने आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याच्या कानाखाली दिली.  १७ मार्चला झालेल्या या घटनेची चौकशी इनप्लाइट सर्व्हिस विभागाने सुरू केल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. कॅबिनेट कर्मचाऱ्याने नवी दिल्ली- फ्रॅंकफर्ट विमानातील बिझनेस क्लासमधील शाकाहारी प्रवाशाला अनाहुतपणे मांसाहारी जेवण दिले. प्रवाशाने यासंदर्भात कॅबिन निरीक्षकाकडे तक्रार केली. पण कोणतीच तक्रार केली नाही. आपल्या चुकीची प्रवाशाने माफी मागितली. तरीदेखील कॅबिन क्रू निरीक्षकाने हे प्रकरण बाहेर काढसे आणि कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली.


चौकशी होणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनिष्ठ कर्मचाऱ्याने याच काही उत्तर दिल नाही. पण यासंदर्भात इनफ्लाइट सर्विस विभागाला याची तक्रार केली. 


आमच्याकडे एअर इंडिया विमान संख्या १२१ (नवी दिल्ली-फ्रॅंकफुर्ट) च्या कॅबिन क्रूमधून तक्रार मिळाली आहे. आरोपांच्या चौकशीसाठी आंतरिक समिती नेमली गेली आहे.