Mobile Blast in Air India : विमान टेकऑफ करताना मोबाईलचा स्फोट झाला आहे. यामुळे  Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. उदयपूर - दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. अचानक स्फोटासारखा आवाज आल्यामुळे विमानातील प्रवाशी भयभित झाले. क्रू मेंबरने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक-470 मध्ये प्रकार घडला आहे. दुपारी एक वाजता या विमानाने उदयपूरहून दिल्लीला उड्डाण केले. या विमानात एकूण 140 प्रवासी होते. उदयपूरहून विमानाने उड्डाण केल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी अचानक विमानात स्फोटाचा आवाज आला. टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला. स्फोटाच्या आवाजामुळे विमानातील प्रवासी भयभित झाले. विमानात एकच गोंधळ उडाला. यावेळी एका प्रवाशाच्या मोबाईल फोनच्या बॅटरी स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.


उदयपूर विमानतळावर  इमर्जन्सी लँडिंग


मोबाईल्या स्फोटानंतप विमानात एकच गोंधळ उडाला यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. उदयपूर विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधून क्रू मेंबर्सनी या विमानाचे उदयपूर विमानतळावर  इमर्जन्सी लँडिंग केले. 


विमानाची तपासणी


उदयपूर विमानतळावर  इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर विमानाची तसेच सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यानंतर हे विमान पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. मोबाईसचा स्फोट कशामुळे झाला. स्फोट झालेला मोबाईल कोणत्या कंपनीचा होता. याचा तपास केला जात आहे. सुरक्षा रक्षकांनी स्फोट झालेल्या मोबाईलचे अवशेष तापासासाठी ताब्यात घेतले आहेत. 


पॅन्टच्या खिशात असलेल्या मोबाईलनं अचानक पेट घेतला


नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथं एका तरुणाच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या मोबाईलनं अचानक पेट घेतलाय. यात एक तरुण थोडक्यात बचावलाय. Redmi note 9 हा मोबाईल खिशात असताना गरम झाल्याचं तरुणाच्या वेळेत लक्षात आलं. त्यानं तातडीनं मोबाईल खिशाबाहेर काढून फेकून दिला तोपर्यंत मोबाईलनं पेट घेतला. त्यानंतर मोबाईलचा स्फोट झाला. यात मोबाईल वापरणारा तरुण थोडक्यात बचावलाय. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना काळजीपूर्वक मोबाईल वापरण्याची वेळ आली.