Pee Gate: `विमानात लघुशंका मी नाही तर...` आरोपी शंकर मिश्राच्या दाव्याने `कहाणी मे ट्विस्ट`
Air India Peeing Incident : एअर इंजिया विमानात लघुशंका केल्याप्रकरणात सुनावणी सुरु झाली असून शंकर मिश्राने केलेल्या दाव्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे
Air India Urination Case: एअर इंडियाच्या विमानात शंकर मिश्रा (Shankar Mishra) या व्यक्तीने महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचं प्रकरण (Air India Peeing Incident) आता कोर्टात पोहोचलंय. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली विमान (Paris-Delhi) प्रवासात मद्यधुंद (alcohol) अवस्थेतील शंकर मिश्राने महिला प्रवाशावर लघुशंका केली. याप्रकरणी शंकर मिश्राला अटक (Shankar Mishra Arrest) करण्यात आली असून कोर्टात (Court) याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान शंकर मिश्रा याने केलेल्या एका दाव्यामुळे या प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे.
शंकर मिश्राचा खळबळजनक दावा
विमानात आपण लघुशंका केली नाही, तर त्या महिला प्रवाशानेच लघुशंका केली, पण आरोप माझ्यावर लावण्यात आला असा दावा शंकर मिश्राने केला आहे. यावर कोर्टानेही विमानात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. आरोपी शंकर मिश्राच्या वकिलांनी मात्र विमानात महिलेच्या सीटपर्यंत पोहोचणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. तसंच महिलेने स्वत:चं लघुशंका केली कारण तिला इनकॉन्टिनेंस नावाचा आजार आहे. ती महिला एक कथक नृत्यांगणा आहे, आणि 80 टक्के कथक नृत्यांगणांना ही समस्या असते असा तर्क आरोपीच्या वकिलांनी लावला.
कोर्टाने मागवला डायग्राम
प्रवासी विमानात एका सीटवरुन दुसऱ्या सीटकडे जाणं सहज शक्य असल्याचं कोर्टाने म्हटलंय. न्यायाधीशांनी विमानात प्रवासी बसण्याची व्यवस्थी कशी होती, याचा नकाशाही मागितला आहे. शंकर मिश्राची पोलीस कस्टडी देण्यावरुन दिल्ली पोलिसांनी कोर्टात आव्हान दिलं आहे. दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राची सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितील होती.
विमानात त्या दिवशी काय घडलं होतं?
न्यूयॉर्कहून दिल्लीला (New York To Delhi Flight) जाणाऱ्या विमानात 26 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. एक महिला प्रवासी या विमानातून प्रवास करत होती. फ्लाईट AI-102 हे विमान दुपारी एक वाजता न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरुन रवाना झालं. काही वेळ वातावरण शांत होतं. पण विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच नशेत असलेला शंकर मिश्रा त्या महिलेच्या सीटजवळ गेला आणि पँटची झीप उघडून त्याने महिलेवर लघुशंका केली.
शंकर मिश्रावर विमान प्रवासाला बंदी
26 नोव्हेंबरला घडलेल्या या घटने प्रकरणी एअर इंडियाकडून पोलिसांत तक्रार (Police Complaint) दाखल करण्यात आली. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनने एका समितीचीही स्थापना केली. आक्षेपार्ह वर्तणूक करणाऱ्या शंकर मिश्राला नो फ्लाई लिस्टमध्ये टाकण्यात आलं असून त्याच्यावर 30 दिवसांची प्रवास बंदी घालण्यात आली आहे.