मुंबई : कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातला सर्व महत्त्वाच्या सेवा बंद आहे. त्यानंतर आता सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे सरकारच्या पुढील निर्णयाकडे आहे. अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमान कंपन्या १४ एप्रिल नंतर कोणत्याही तारखेसाठी बुकिंग करू शकतात. २५ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. १४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे, असं सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितलं होतं.



शिवाय एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटनेनं वैमानिकांच्या वेतनात १० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू या वेतन कपातीच्या निर्णयाला वैमानिकांनी विरोध केला आहे. लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही प्रकारे वेतन कपात न करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची आठवण देखील वैमानिकांनी याप्रसंगी करून दिली होती. 


दरम्यान  एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांनी कंपनीच्या सीएमडींना  पत्र पाठवले आहे. शिवाय आम्ही हा निर्णय स्वीकारत नसल्याचं नसल्याचं देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे.